अरे बाप रे ! इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्याला घेऊन शिक्षिका झाली पसार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : गुजरातमधील गांधीनगर येथून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शाळेत ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा १४ वर्षीय विद्यार्थ्यावर जीव जडला. प्रेमात वेड्या झालेल्या या शिक्षिकेने विद्यार्थ्याला घेऊन पळ काढला. दरम्यान, या शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली म्हंटले की, शिक्षिकेने विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले असून आता ती त्याला घेऊन पसार झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी शिक्षिकेच्या घरी जाऊन चौकशी केली असता शिक्षिका घरी सापडली नाही. या प्रकरणाने पोलिसही हैराण झाले आहे.

मुलाचे वडील गांधीनगर उद्योग भवनमध्ये सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी सांगितले कि, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता कामावरून घरी आल्यानंतर पत्नीने सांगितले की, मुलगा अद्याप घरी आला नाही. त्यामुळे मी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. परंतु, तो कुठेच सापडला नाही. अखेर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. दरम्यान, पोलीस निरीक्षक के. के. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार पालकांच्या तक्रारीवरून शिक्षिकेविरोधात कलम ३६३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिका व मुलाकडे फोन नसल्याने ते दोघे सध्या कुठे आहे, हे शोधणे कठीण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –