‘आधार’कार्डशी लिंक नसेल तरी देखील रद्द होणार नाही ‘पॅन’कार्ड : उच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन आणि आधार जोडण्याच्या कालावधीमध्ये अनेकदा वाढ करण्यात आलेली आहे. आता यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुभा देण्यात आली आहे. या कालावधीपर्यंत जर आधाराला पॅन जोडले नाही तर पॅनकार्ड निष्क्रिय होणार यावर गुजरात उच्च न्यायालयाने एका आदेशात असे म्हंटले आहे की, पॅन कार्ड आधारला लिंक झाले नाही तर पॅन रद्द होणार नाही.

हायकोर्टाने सांगितले आहे की, आधार कार्डच्या व्हॅलिडिटीबाबत सध्या सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. जोपर्यंत यावर अंतिम निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत आयकर विभाग लिंक करण्याचे आदेश देऊ शकत नाही. तसेच हायकोर्टाने हे देखील सांगितले की पॅन आणि आधार लिंक करण्याचा कालावधी वारंवार वाढवून देणे देखील चुकीचे आहे.

न्यायमूर्ती हर्षा देवानी आणि न्यायमूर्ती संगीता के. विझन यांच्या खंडपीठाने म्हटले की, रॉजर मॅथ्यू – साउथ इंडियन बँक लिमिटेड प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्राप्तिकर अधिनियम कलम 139AA वैध नाही. गुजरात हाय कोर्टाने अटकेत असलेल्या सौरभ सोपारकर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला होता. तसेच पॅन कार्डला रद्द घोषित करता येणार नसल्याचेही न्यायालयाने सांगितले. जोपर्यंत न्यायालय या केस संबंधी काही निर्णय देत नाही तोपर्यंत हा निर्णय असाच राहणार आहे. जर आयकर विभागाकडे माहिती दिली तर याबाबतची सर्व खाजगी गोपनीय माहिती हरवू शकते.

फेसबुक पेज लाईक करा –