ओसामा बिन लादेनचा मुलगा आणि ‘अल कायदा’चा उत्‍तराधिकारी ‘हमजा’चा ‘खात्मा’, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

वॉशिंग्टन : ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन ठार झाला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून या वृत्तास दुजोरा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, ‘अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील दहशतवादविरोधी कारवाईत अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा हमजा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे.’

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हमजा बिन लादेनच्या मृत्यूने केवळ अल कायदालाच कमकुवत केले नाही तर त्याच्या वडिलांशी प्रतीकात्मक संबंधही संपुष्टात आणले आहेत आणि अल कायदाला आणि तिच्या कारवायांना लगाम घातला आहे. तथापि, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे मात्र सांगितले नाही की हमजा कुठे आणि कोणत्या परिस्थितीत मरण पावला.

हे होते हमजाचे शेवटचे सार्वजनिक वक्तव्य
हमजाने बोललेले शेवटचे सार्वजनिक वक्तव्य २०१८ मध्ये अल कायदाच्या मीडिया विंगने प्रसिद्ध केले होते. त्या संदेशात हमजाने सौदी अरेबियाला धमकावले आणि अरब द्वीपकल्पातील लोकांना बंड करण्यास सांगितले होते. त्यानंतर यावर्षी मार्चमध्ये सौदी अरेबियाने त्याचे नागरिकत्व काढून घेतले होते.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच मृत्यूची बातमी
अमेरिकन मीडियाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच माहिती दिली होती की अमेरिकेच्या दोन वर्षांच्या कारवाईनंतर हमजा बिन लादेनचा मृत्यू झाला आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यास दुजोरा न देता ते जाहीरपणे स्वीकारण्यास नकार दिला होता. तथापि, अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी गेल्या महिन्यात हमजाच्या मृत्यूची पुष्टी केली होती.

ओसामाच्या २० मुलांपैकी हमजा १५ वा
ओसामा बिन लादेनच्या २० मुलांपैकी १५ वा मुलगा असलेला हमजा बिन लादेन सुमारे ३० वर्षांचा होता. तो ओसामाच्या तिसर्‍या पत्नीचा मुलगा होता. ओसामाच्या मृत्यूनंतर तो अल कायदाचा नेता म्हणून उदयास येत होता. फेब्रुवारी २०१९ मध्ये हमजावर दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले गेले होते.

‘जिहादचा राजकुमार’ कडे होती ही जबाबदारी
मिळालेल्या माहितीनुसार हमजाला बऱ्याचदा ‘जिहादचा राजकुमार’ या पदवीने ओळखले जायचे. हमजाचे ऑडिओ आणि व्हिडिओ संदेश समोर आले आहेत ज्यामध्ये तो अमेरिका आणि इतर देशांमध्ये हल्ल्याची धमकी देत असे. खासकरुन मे २०११ मध्ये अमेरिकेच्या सैन्याने मारलेल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हमजाचे असे अनेक व्हिडिओ समोर आले. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या अल-कायदाच्या नव्या पिढीला आकर्षित करणे हे हमजाचे काम होते, या हल्ल्यात सुमारे ३,००० लोक ठार झाले होते.

२०११ मध्येओसामाचा मृत्यू आणि इस्लामिक स्टेट गटाच्या उदयानंतर अल-कायदाने तरुण जिहादी लोकांमध्ये आपली प्रतिष्ठा गमावली आहे. तथापि, अमान अल ज़वाहिरी याच्या नेतृत्वात हा गट अत्यंत गुप्त मार्गाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –