Birthday SPL : 7 वर्षांचा झाला ‘किंग’ खानचा ‘नन्हा’ राजकुमार अबराम, पहा पॉप्यलर स्टारकिडचा क्युट अंदाज !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा नन्हा राजकुमार अबराम खान आज(बुधवार दि 27 मे 2020) 7 वर्षांचा झाला आहे. अबराम घरातील सर्वात लहान सदस्य आहे त्यामुळं तो सर्वांचा लाडका आहे. वडिल शाहरुख खान असो किंवा मग बहिण सुहाना खान असो त्याला सर्वांचंच खूप प्रेम मिळतं. अबरामच्या जन्मानंतर अनेकदा याबद्दल अंदाज लावले जात आहेत की, त्याचा जन्म हा सरोगेसीनं झाला आहे. परंतु शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी कधीच ही गोष्ट स्विकार केली नाही.

अबराम बॉलिवूडमधील सर्वात लाडका आणि लोकप्रिय स्टारकिड आहे यात काहीच शंका नाही. तो लहान होता तेव्हापासूनच सर्वांचा आवडता आहे. शाहरुख खानही अनेकदा त्याला सिनेमाचं प्रमोशन किंवा आउटडोर शुटींगसाठी सोबत नेत असतो.

अबराम खान अनेकदा आपल्या क्युट फोटोंमुळंही चर्चेत आला आहे. त्याचे फोटो अनेकदा सोशलवर व्हायरल होताना दिसले आहेत. त्याचा क्युट आणि ग्लॅमरस अंदाज नेहमीच चाहत्यांना आवडला आहे. कधी शाहरुख त्याचे फोटो शेअर करत असते तर कधी गौरी शेअर करत असते. अबराम मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमध्ये आपलं शिक्षण घेत आहे.