‘हार्दिक पांड्या’च्या घरी येतोय लहान ‘पाहुणा’, ‘आई’ होणार ‘नताशा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याची मंगेतर बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच आई होणार आहे. हार्दिकने आपल्या चाहत्यांना एक चांगली बातमी शेअर केली आहे. आपली मंगेतर नताशा गर्भवती असल्याचे हार्दिकने उघड केले आहे. हार्दिकने इंस्टाग्रामवर नताशासोबत एक फोटो शेअर केला असून त्यात स्पष्ट दिसत आहे की नताशा आई होणार आहे. हार्दिक पांड्याने यावर्षी जानेवारीत सर्बियन अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचशी लग्न केले. हार्दिकने नवीन वर्षाची सुरुवात शानदार शैलीने केली होती.

असेही म्हटले जात आहे की दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. हार्दिक आणि नताशा बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते, पण ते लोकांसमोर कधीही त्यांच्या नात्याबद्दल बोलले नव्हते. चित्रपटांव्यतिरिक्त नताशा अलीकडेच ‘नच बलिये 9’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. या व्यतिरिक्त ती ‘बिग बॉस 8’ मध्ये देखील दिसली आहे. पांड्याने त्याच्या इंस्टाग्रामवर नताशाबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. यासह त्याने असे लिहिले की नताशा आणि मी बऱ्याच काळापासून एकत्र आहोत. आम्ही लवकरच आमच्या आयुष्यात नवीन अतिथीचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.

नताशा स्टॅनकोविच मूळची सर्बियाची आहे. तिने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या प्रवासाची सुरुवात बॉलिवूडचे दिग्गज कलाकार प्रकाश झा यांचा चित्रपट सत्याग्रह पासून केली होती. नताशा आणि हार्दिकने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 जानेवारी 2020 ला दुबईमध्ये साखरपुडा केला होता. हार्दिकने आपल्या साखरपुड्याची घोषणा सोशल मीडियावर जाहीर करून सर्वांना चकित केले होते. यावेळीही त्याने वडील होण्याच्या बातमीने सर्वांनाच चकित केले आहे. लॉकडाऊन दरम्यान हार्दिक आणि नताशा दोघेही एकमेकांसोबत राहत होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like