निर्भयाला न्याय मिळवून देणाऱ्या वकील सीमा संवृद्धि लढणार ‘हाथरस’ची केस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  निर्भयाचा खटला लढवणाऱ्या वकील सीमा संवृद्धि यांनी हाथरसकडे प्रस्थान केले आहे. हातरसच्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सीमाने तिचा खटला विनाशुल्क लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हाथरसमध्ये ती पीडित मुलीच्या कुटूंबाला भेटून त्यांच्याशी बोलणार आहे. सीमा यांनी पीडितेच्या कुटूंबाशी फोनवरून चाटच केली आहे.

या दरम्यान,सत्यम दुबे, वकील विशाल ठाकरे आणि रुद्र प्रताप यादव यांच्या तर्फे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रीम कोर्टाला निष्पक्ष चौकशीसाठी योग्य तो आदेश मिळावा, असे आवाहन चौकशीकर्त्यांनी केले आहे.जनहित याचिकेत केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) किंवा एसआयटीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी असे आवाहनही त्यांनी केले आहे.या याचिकेत हाथरास येथील प्रकरणाची चौकशी सुप्रीम कोर्टाचे किंवा उच्च न्यायालयाचे विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्याकडून करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.याशिवाय उत्तर प्रदेशमधील खटल्याची चौकशी व खटला निष्पक्ष होणार नाही, म्हणून हे प्रकरण दिल्लीला हलविण्यात यावे, असे पीआयएलने म्हटले आहे.

याचिकेत नमूद केले आहे की पीडित मुलीवर आधी बलात्कार केला गेला आणि नंतर त्याच्यावर निर्घृणपणे हल्ला करण्यात आला आणि वैद्यकीय अहवालानुसार तिची जीभ काढून टाकली गेली आणि गळ्यातील आणि पाठीची हाडे आरोपींनी मोडली. यानंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात पीडितेचा मृत्यू झाला.