‘हेल्दी हार्ट’साठी एक्सरसाईज अन् डाएटसोबत करा ‘हा’ वेगळा सोपा उपाय ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – तुम्हाला माहिती आहे का पाळीव प्राणी आापल्या आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जर तुमच्याकडे एखादा कुत्रा असेल तर यामुळं तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

मेयो क्लिनिक प्रेसीडिंग्स : इनोवेशन क्वालिटी अँड आऊटकम्स मध्ये एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. 1769 लोकांवर हा रिसर्च करण्यात आला होता. यातील लोकांना हृदयाची कोणतीच समस्या नव्हती. यातील काही लोकांकडे पाळीव प्राणी होते तर काही लोकांकडे नव्हते.

या सहभागी लोकांना बॉडी मांस इंडेक्स, डाएट, फिजिकलअ‍ॅक्टीव्हिटी, स्मोकिंग स्टेटस, ब्लड प्रेशर, ब्लड ग्लूकोज आणि कोलेस्ट्रोल यावर आधारीत गुण देण्यात आले. यानंतर ज्या लोकांकडे पाळीव प्राणी होते त्यांच्या कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थची तुलना ज्या लोकांकडे पाळीव प्राणी नव्हते त्यांच्याशी केली.

ज्या लोकांकडे पाळीव प्राणी नव्हते त्यांच्या तुलनेत पाळीव प्राणी असणाऱ्या लोाकांच्या हृदयाचं आरोग्य हे उत्तम होतं. यात असंही सांगितलं आहे की इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कुत्रे जास्त अ‍ॅक्टीव असतात. त्यामुळं त्यांना सांभाळणाऱ्या व्यक्तीही आपोआपच अ‍ॅक्टीव राहतात. हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी या अ‍ॅक्टीवनेसची खूप मदत होते.

रिसर्चमध्ये ही बाब समोर आली आहे की, कुत्र्यामुळं मेंटल स्ट्रेस कमी होणं आणि सोशल अ‍ॅक्टीविटीमध्ये सहभागी होणं या गोष्टींचं प्रमाण वाढतं. यामुळं मानसिक आरोग्यही चांगलं राहतं. हा पॉझिटीव्ह चेंज हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतो.