Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी PV सिंधूनं दिली 10 लाखांची देणगी, PAK क्रिकेटपटूही आले समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस जगभर पसरला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात, त्याद्वारे संक्रमित लोकांची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत 10,000 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने भारतातील कोरोना संक्रमित लोकांना मदत करण्यासाठी 10 लाख रुपये देण्याचे ठरविले आहे. त्याचबरोबर सर्व देशांचे क्रिकेटपटू आणि खेळाडू आपापल्या देशांतून मदतीची रक्कम देत आहेत.

विश्वविजेती भारतीय महिला बॅडमिंटनपटू सिंधूने कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मदत केली आहे. तिने गुरुवारी दहा लाख रुपयांची देणगी जाहीर केली. सिंधूने आंध्र प्रदेशला प्रत्येकी पाच लाख तर तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीला 5 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

सिंधूने तिच्या सोशल अकाउंटवर लिहिले की, ‘कोविड 19 च्या विरोधात लढण्यासाठी मी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर करते.’

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी 50 लाख देणार आहे. ही देणगी पाकिस्तान सरकारच्या आपत्कालीन निधीमध्ये जमा केली जाईल. पीसीबीचे कर्मचारी या देणगीसाठी आपला एक दिवसाचा पगार तर सरव्यवस्थापक किंवा उच्च पदावर काम करणारे सर्व लोक त्यांच्या दोन दिवसाचे पगार देणार आहे.

कोरोना व्हायरसमुळे श्रीलंका देश देखील संकटात सापडला आहे आणि अशा कठीण काळात इथल्या क्रिकेटर्सनी मदतीचा हात पुढे केला आहे. टीम खेळाडूंनी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) याबाबत माहिती देताना सांगितले की, खेळाडूंनी ‘लॅनिगोस्कोफ’ हा व्हिडिओ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कोरोना व्हायरसच्या उपचारात वापरले जाते. श्रीलंका क्रिकेटकडून एकूण 25 मिलियन मदत सरकारला देण्यात येत आहे.