कोरफड मूळव्याधीवर गणुकारी, जाणून घ्या इतर 8 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आयुर्वेदात अश्या अनेक औषधी वनस्पती दडलेल्या आहेत ज्या आपल्या अवतीभवती अगदी सहज सापडू शकतात. आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्याने त्यांचे महत्व आपल्याला माहिती नसते. अश्याच एका बहुगुणी औषधी वनपस्ती बद्दल आज आपण माहिती करुन घेणार आहोत. कोरफड हे नाव आपल्या सर्वानाच परिचित आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणून सुपरीचीत आहे. चमत्कारिक रोपटे म्हणूनही याला ओळखले जाते, बाजारात कोरफड पासून बनवलेल्या त्वचेसंबंधी बरेच उत्पादन अगदी सहज रित्या उपलब्ध होतात.

कोरफडीच्या रसात व्हिटॅमिन ए, सी, बी१, बी२, बी३, बी४, फोलिक अॅसिड हे घटक असतात. तर कोरफडीचा रस मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा करतात. तसेच कोरफडीचा वेगवेगळ्या आजारातही उपयोग करता येतो.

>> कोरफडीचा रस हा अत्यंत गुणकारी असून, त्याच्या गराचा किंवा सुकलेल्या गराचा वापर अनेक रोगांवर केला जातो.

>> अपचन होत असल्यास कोरफडीचा गर, हळद आणि सैंधव मीठ एकत्र करुन घेतल्यास त्रास कमी होतो.

>> त्वचेवर भाजल्याचे किंवा चटका लागल्याचे व्रण, डाग असतील तर त्यावर कोरफडीचा गर लावावा.

>> हात पायांची आग होत असल्यास कोरफडीचा गर लावावा. शरीराला थंडावा मिळतो.

>> शौच साफ होत नसल्याचं कोरफडीचा पाच मिलीलीटर रसात अर्धा चमचा मध घालून रोज सकाळी नाशत्यापूर्वी घ्यावा त्यामुळे पोट साफ होते. तसेच भूक वाढण्यास देखील मदत होते.

>> कोरफडीच्या रसात सैंधव मीठ (एक चमचा रस + चिमूटभर मीठ) घालून सकाळ-रात्री दिल्सास कफ, खोकला, डांग्या खोकला थांबतो.

>> नाकातून सातत्याने रक्त येणे, अनेक प्रकारचे त्वचाविकार, पित्त उठणे, रक्ताच्या गाठी, खाज-खरूज-फोड यासाठी मंजिष्ठ, हळद आणि कोरफडीचा उपयोग होतो.

>> डोळे येणे, मूळव्याधीची आग किंवा ठणका, मार लागून रक्त साखळणे, भाजलेल्या जागेची आग होणे या समस्यांमवर देखील कोरफडीचा गर बाहेरून लावल्यास परिणाम होते.