Health Benefits Of Peanuts | शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर, ‘या’ आजाराचाही धोका होतो कमी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Peanuts | आजच्या धकाधकीच्या युगात व्यक्तींमध्ये हृदयविकार (Heart Disease) होण्याचे प्रमाण वाढले आहे. असंतुलित आहार (Unbalanced Diet) आणि व्यायामाचा अभाव (Lack Of Exercise) हेही त्याची इतर कारणे आहेत. अशा परिस्थितीत शेंगदाण्याचे सेवन केल्याने इस्केमिक स्ट्रोक (Ischemic Stroke) किंवा हृदयविकाराचा धोका (Risk Of Heart Attack) कमी होऊ शकतो (Health Benefits Of Peanuts).

 

याबाबतीत जपानमध्ये तेथील शास्त्रज्ञांनी दररोज शेंगदाणे (Peanuts) खाणार्‍या नागरिकांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळले की, जे नागरिक दररोज शेंगदाणे खात होते त्यांचे हृदय (Heart) इतर जणांच्या तुलनेत निरोगी आहे. या आधी अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातही शेंगदाणे खाण्याने हृदय मजबूत होतं, असं म्हटलं होतं. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोसिएशन स्ट्रोकमध्ये (Journal of the American Heart Association Stroke) प्रसिद्ध झाले. चला जाणून घेऊयात, हृदयरोग्यांसाठी शेंगदाणे कसे फायदेशीर (Health Benefits Of Peanuts) आहेत.

 

इस्केमिक स्ट्रोकचा धोका (Risk Of Ischemic Stroke) –
इस्केमिक स्ट्रोक ही मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे उद्भवणारा एक गंभीर आणि प्राणघातक आजार आहे. शेंगदाण्याचे सेवन (Peanut Intake) केल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका अतिशय कमी होऊ शकतो. तसेच आपल्या आहारात शेंगदाण्यांचा समावेश करून गंभीर समस्या टाळता येऊ शकतात, असा निष्कर्ष जपानस्थित युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिनचे (University Graduate School of Medicine) प्राध्यापक आणि अभ्यासाचे मुख्य संशोधक सतोयो इकेहारा (Satoyo Ikehara) यांनी सादर केला आहे.

 

जपानमधील ७४ हजारांहून अधिक स्त्री-पुरुषांवर केलेल्या अभ्यासात शेंगदाण्याचे सेवन फायदेशीर आढळून आले आहे. ज्यामध्ये शास्त्रज्ञांनी अनेक स्तरातून भुईमुगाच्या शेंगा खाल्याने हृदयरोगाचा धोका कमी झाल्याचे परीक्षण केले. सर्व प्रकारच्या तपासणीत, शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की दररोज फक्त ४-५ शेंगदाणे खाल्ल्याने इस्केमिक स्ट्रोकचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. त्याच वेळी, सामान्य स्ट्रोकचा धोका १६ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. शेंगदाण्यामुळे हृदयरोगाचा धोका १३ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

शेंगदाणे खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Peanuts)
बर्याच पोषक तत्वांनी समृद्ध शेंगदाणे आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांमध्ये समृद्ध असतात. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Monounsaturated Fatty Acid), पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड (Polyunsaturated Fatty Acid), मिनरल्स (Minerals), व्हिटॅमिन्स (Vitamins) आणि डिट्री फायबर (Dietary Fiber) असतात. हे सर्व पोषक घटक खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण (Cholesterol Level) कमी करतात, तसेच उच्च-रक्तदाब (High Blood Pressure) आणि तीव्र दाह (Acute Inflammation) होण्याचा धोका कमी करू शकतात. ज्यामुळे साहजिकच हृदयरोगाचा धोका कमी होतो.

 

खाण्याचे प्रमाण (Quantity Of Eat) –
अमेरिकन हार्ट असोसिएशनने सर्व नागरिकांना हृदयरोगाचा धोका टाळण्यासाठी कमीतकमी पाच दिवस दर
आठवड्याला २ चमचे सर्व प्रकारच्या काजूचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.
शेंगदाण्याबरोबरच अक्रोड (Walnuts), काजू (Cashews), पेकॅन (Pecan), मॅकाडामिया (Macadamia) आणि हेझलनट्स (Hazelnuts)
यांचं सेवनही हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं, असेही अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधकांचे म्हणणे आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Health Benefits Of Peanuts | peanuts health benefits in marathi peanuts good for heart and reduce cardiovascular risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुंडाने भरदिवसा रस्त्यावरुन उचलून नेऊन 12 वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार; जनता वसाहतीत घडलेली घटना

 

Amruta Fadnavis | रंगपंचमीचे फोटो शेअर करत अमृता फडणवीसांनी केली ‘नॉटी’ कमेंट, दिल्या शुभेच्छा

 

Pune Crime | धक्कादायक ! 11 वर्षाच्या मुलीवर वडिल, भाऊ आणि आजोबा, चुलत मामाने केले लैंगिक अत्याचार; समुपदेशक महिला ‘गुड टच अ‍ॅन्ड बॅड टच’ शिकवताना पिडीतीने सांगितली ‘आपबिती’