Health Benefits Of Salad | जर तुम्हाला वाढते वजन कंट्रोल करायचे असेल तर डाएटमध्ये समावेश करा ‘या’ 2 ‘सलाड’चा; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Health Benefits Of Salad | वाढते वजन हे आपल्या आरोग्याचा शत्रू आहे. वजन नियंत्रणात (Weight Control) ठेवण्यासाठी केवळ वर्कआउटच नव्हे तर आहारावरही नियंत्रण (Dietary Control) ठेवणे आवश्यक आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कॅलरी (Calories) कमी आणि पोषकतत्वे (Nutrients) जास्त असलेले पदार्थ खा. वजन नियंत्रणासाठी सलाड (Salad) चे सेवन करणे खूप प्रभावी (Health Benefits Of Salad) आहे.

 

जेवणासोबत सलाडचे सेवन केल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण आपली भूकही लवकर शमते. कमी उष्मांक असलेले हेल्दी फूड (Healthy Food) खाल्ल्यानंतर भूक लवकर लागत नाही, पण शरीर तंदुरुस्त राहते.

 

दोन प्रकारचे सलाड (Two Types Of Salad)
सलाड खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते (Weight Under Control), लिव्हर डिटॉक्स (Liver Detox) होते आणि साखरही नियंत्रणात राहते. एवढेच नव्हे तर सलाडचे सेवन केल्याने दृष्टीही वाढते (Eye Sight Increases) आणि त्वचाही सुधारते. सलाडमध्ये व्हेजिटेबल सलाड (Vegetable Salad) आणि फ्रुट सलाड (Fruit Salad) हे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर (Beneficial For Health) आहे. ते खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतात, तसेच वजनही नियंत्रित राहते (Health Benefits Of Salad).

 

1. ग्रीन सलाड (Green Salad)
झटपट वजन नियंत्रणासाठी ग्रीन सलाडमध्ये टोमॅटो (Tomato), कांदा (Onion), कोबी (Cabbage), ब्रोकोली (Broccoli), मुळा (Radish), गाजर (Carrot), बीट (Beetroot) आणि पार्सले यांचा समावेश होतो.

 

2. फ्रूट सलाड (Fruit Salad)
फ्रूट सलाडमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या फळांचा समावेश केल्याने त्यांची चव तर वाढतेच पण आरोग्यालाही फायदा होतो. फ्रूट सलाडमध्ये तुम्ही सफरचंद (Apple), संत्री (Orange), केळी (Banana), डाळिंब (Pomegranate) आणि आंबा (Mango) खाऊ शकता.

 

कमी कॅलरी आणि फायबर युक्त सलाड खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि पोटही लवकर भरते.

सलाड खाण्याचे फायदे (Benefits Of Eating Salad)…

1. पचनक्रिया निरोगी राहते (Healthy Digestion) :
सलाडमध्ये कॉर्न, कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, ब्रोकोली, कोबी, पुदिन्याची पाने, लिंबू आणि टोमॅटोचे सेवन केल्याने शरीराला भरपूर प्रोटीन (Protein), जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे (Minerals), फायबर (Fiber) मिळतात ज्यामुळे पचनक्रिया (Digestion) बरोबर राहते आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील पूर्ण होते.

 

2. डोळे निरोगी राहतात (Healthy Eyes) :
रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांमध्ये झेक्सॅन्थिन (Zeaxanthin), व्हिटॅमिन सी (Vitamin C), ल्युटीन (Lutein) आणि झिंक (Zinc) असते,
जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त (Beneficial For Eye Health) आहे.
सलाडमध्ये असणारी जीवनसत्त्वे डोळ्यांची रेटिना निरोगी ठेवतात आणि डोळ्यांना होणारे नुकसान टाळतात.

 

3. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते (Control Cholesterol) :
जेवणासोबत सलाडचे सेवन केल्याने किंवा स्नॅक (Snack) म्हणून सलाडचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात,
जे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासही प्रभावी ठरते.

 

4. बद्धकोष्ठता दूर करते (Relieve Constipation) :
कोशिंबीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. सलाडमध्ये असलेले फायबर पोट साफ करते.
याच्या सेवनाने शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते आणि इम्युनिटी मजबूत होते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Health Benefits Of Salad | if you want to get rid of weight so include these two types of salad in your diet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तुम्ही PhonePe वर पेमेंट स्वीकारता तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी; पुण्यात तिघा सराफांची फसवणूक

 

Turmeric For Sugar Control | शुगर कंट्रोल करतो हळदीचा चहा, जाणून घ्या कसा करावा वापर

 

Cinnamon and Honey Benefits | मध आणि दालचीनीचे मिश्रण आरोग्यासाठी अतिशय लाभदायक; जाणून घ्या