सावधान ! ‘कोरोना’ रूग्ण बरे झाल्यानंतर देखील 90 दिवसांपर्यंत संसर्ग पसरवू शकतात

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस कहर अजूनही जगभरात वाढतच आहे. दररोज नवनवीन आकडेवारी आणि कोरोनाची माहिती समोर येत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावर रात्रंदिवस अभ्यास करत आहेत. अमेरिकेतील विविध रुग्णांलयातील डेटाच्या विश्लेषणातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, कोविड-19 च्या आजारातून रिकव्हर झालेल्या अतिगंभीर रुग्णांच्या शरीरात जवळपास 90 दिवस सार्स कोव्ह-2 व्हायरस असतो, असे आढळून आले आहे.

विश्लेषणातील मुख्य मुद्दे

1 कोरोनाने गंभीर आजारी रूग्ण 90 दिवस संक्रमित असतात, असे अमेरिकेतील अटलांटा येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीत आढळले आहे.

2 कोरोनापासून रिकव्हर झालेले लोक 15 मिनिटांत दुसर्‍या व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरवू शकतात.

3 जर कोणताही आजार अशा रुग्णांना 90 दिवसांनंतर झाला, तर तो कोरोना नव्हे.

4 अशा रुग्णांमध्ये व्हायरस प्रसार करण्याची क्षमता जास्त असते.

5 याच कारणामुळे भारतात 64 लाखांहून अधिक लोक संक्रमित, तर 1 लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला.

6 सौम्य आणि मध्यम रुग्णांमध्ये संसर्ग फक्त 10 दिवस असतो.

7 ज्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. परंतु, मध्यम स्वरुपात आजारी असतात ते 20 दिवस व्हायरस पसरवतात.

याबाबत केअर हॉस्पिटलचे रोगतज्ज्ञ डॉ. मुस्तुफा अफझल यांनी सांगितले की, आयसोलेशन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. पण, त्यांच्यात प्रतिकारशक्ती आढळून आली. अशा रुग्णांची तपासणी दर आठवड्याला केली जात आहे. अँटिबॉडीच्या पातळीनुसार, त्यांना पुन्हा ड्यूटीवर घेण्याबाबत ठरविले जाते.