पोटाचे आजार व व्हेरीकोज व्हेन्स यावर मोफत उपचार शिबीर

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – प्राथमिक आरोग्य केंद्र, कुंजीरवाडी हिलींग हँन्डस् क्लिनिक व हिलींग हँन्डस् फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोटाचे सर्व विकार व व्हेरीकोस व्हेन्स यावर एक मोफत शिबिराचे आयोजन केले होते यात नागरिकांनी मोठा सहभाग घेतला.

शिबिराचे नियोजन अनिता सैद यांनी केले. यावेळी गावच्या सरपंच सुनिता संदीप धुमाळ तसेच उपसरपंच नाना कुंजीर, माजी सरपंच दत्तात्रय कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मेहबूब लुकडे, सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व आशा वर्कर, आशा वर्कर पर्यवेक्षिका रेखा कुंजीर, तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात यांनी सहकार्य केले.

अश्विन पोरवाल याच्या हिलींग हँन्डस् क्लिनिक व हिलींग हँन्डस् फाऊंडेशन च्या वतीने मोफत औषध वाटप केले. मूळव्याधचा त्रास हा पोट साफ न झाल्यामुळे होतो. त्यामुळे पोट साफ होण्यासाठीचे औषध मोफत वाटण्यात आले. हिलींग हॅन्डस् चे सदस्य आनंद मिसाळ, किरण अरडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुनील वाघमारे यांनी केले प्रस्तावना डॉ. मेहबूब लुकडे यांनी केले आभार प्रदर्शन राहुल वाळके यांनी केले

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/