Coronavirus Symptoms : त्वचेवर पुरळ उठणे सुद्धा आता ‘कोरोना’चे लक्षण आहे का ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस महामारीशी सध्या संपूर्ण जग लढत आहे. तर कोरोना प्रकरणांची संख्या एक कोटी 38 लाखांच्या पुढे गेली आहे, परंतु अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की, हा संसर्ग किती जोखमीचा आहे किंवा याची लक्षणे किती गंभीर असू शकतात. याशिवाय कोविड-19 ची लक्षणे प्रत्येक रूग्णात वेगवेगळी दिसतात. मुले, वृद्ध, गरोदर महिला किंवा तरूणांमधील याच्या लक्षणांबाबत स्पष्टता नाही. कोविड-19 हा श्वासाशी संबंधित एक संसर्ग आहे. परंतु, लोकांमध्ये याची वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत, जसे की त्वचेवर पुरळ येणे. लंडनच्या किंग्ज कॉलेजने केलेल्या शोधात कोरोनाचे नवीन लक्षण समोर आले आहे. अनेक लोकांमध्ये ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासह त्वचेवर पुरळसुद्धा दिसून आली आहे.

काय सांगतो शोध
किंग्ज कॉलेजमध्ये झालेल्या एका नवीन संशोधनात आढळले की, अनेक लोकांमध्ये कोविड-19 ची सुरूवातीची लक्षणे त्वचेवर सुद्धा दिसून येत आहेत. विशेषता त्या लोकांमध्ये ज्यांच्यामध्ये संक्रमणाची सामान्य लक्षणे दिसून येत नाहीत. यासाठी त्वचेवर पुरळ दिसताच योग्य उपचार होणे गरजेचे आहे. हा शोध ब्रिटनमधील 3,36,000 लोकांवर करण्यात आला होता. त्यांचा डेटा कोविड अ‍ॅपमधून घेण्यात आला होता. या शोधात आढळून आले की, 8.8 टक्के लोक जे कोरोना व्हायरस पॉझीटिव्ह आढळले, त्यांनी त्वचेवर पुरळची लक्षणे असल्याची नोंद केली होती.

कशाप्रकारे पुरळ दिसू शकते ?
शोधानुसार, कोविड-19 च्या लक्षणांच्या रूपात पुरळची माहिती देणार्‍या लोकांमध्ये तीन प्रकारची पुरळ दिसून आली.

– हाईव्ज़, जी अचानक येते, लांल रंगाची होते आणि यामुळे त्वचेवर सूज सुद्धा दिसून येते. परंतु ही थोड्या वेळातच निघूनही जाते, परंतु अनेकदा खुप वेळ राहते सुद्धा.

– घोमोळे, चिकनपॉक्स. दोन्ही एकसारख्याच दिसतात, ज्या नेहमी उन्हाळ्यात येतात. परंतु, हे कोरोना व्हायरसची लक्षणे म्हणून सुद्धा दिसू शकतात.

– कोविड टोज़: अशाप्रकारच्या लक्षणांमध्ये हाता पायांच्या बोटांमध्ये सूज आणि वेदना जाणवतात.

काय केले पाहिजे ?
कोरोना व्हायरसची लक्षणे सामान्य वायरल इन्फेक्शनप्रमाणे आहेत, परंतु तरी सुद्धा या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अनेक वायरल इन्फेक्शनचा परिणाम त्वचेवर सुद्धा होतो. यासाठी कोविड-19 मुळे त्वचेवर येत असलेल्या पुरळमुळे फारसे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. अनेक लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण म्हणून सर्वप्रथम त्वचेवर पुरळ दिसून आली आहे. यामुळे त्वचेवर पुरळ, रॅश दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि कोरोना व्हायरस टेस्ट करा.

You might also like