Work From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’ 4 सोप्या टिप्स जाणून घ्या

कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते. त्यावेळेपासून आजपर्यंत अनेक लोक घरातूनच ऑफिसचे काम करत आहेत. वर्क फ्रॉम होममध्ये सतत एकाच स्थितीत बसून काम करावे लागत असल्याने पाठीदुखी होणे स्वाभाविक आहे. एकाच पोश्चरमध्ये जास्त काळ बसून काम करण्याचा हा परिणाम आहे.

काही नैसर्गिक उपाय केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हे उपाय करून पहा

1 जेव्हा घरातून काम करत असाल आणि एका खुर्चीवर बसला असाल, तर कुशनच्या आधाराने गरम पाण्याची पिशवी पाठीवर ठेवा. गरमी अधारित उपचार पाठदुखी कमी करण्यात मदत करेल. हे तोपर्यंत ठेवा जोपर्यंत बॅग थंड होत नाही आणि काही मिनिटांच्या ब्रेकनंतर पुन्हा तसेच करू शकता.

2 एक बादली कोमट किंवा थोड्या गरम पाण्यात निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाका. या पाण्याने आंघोळ करा, यामुळे पाठीच्या दुखण्यासह संपूर्ण शरीराच्या दुखण्यापासून सुद्धा आराम मिळू शकतो. यामुळे तणावाचा स्तरसुद्धा कमी होतो.

3 एक ग्लास गरम दूधात एक चिमुट हळद आणि काही थेंब मध मिसळा. याची सवय लावून घेण्याचा प्रयत्न करा आणि हे रोज प्या. याच्यामुळे शरीराचे दुखणे, पाठदुखी सोबच सर्दी-खोकला दूर होतो.

4 खोबरेल तेल आणि कापूरचे मिश्रण पाच मिनिटांपर्यंत उकळवा. ते थंड करा आणि एका बाटलीत भरून ठेवा. झोपण्यापूर्वी आठवड्यातून किमान दोन वेळा या तेलाने पाठीला मॉलिश करा. याच्यामुळे पाठदुखी दूर होईल.