Public Toilets Can Spread COVID-19 : सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये ‘कोरोना’ संक्रमणाचा धोका जास्त, ‘कसा’ ते जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना कालावधीत जोपर्यंत कोरोनाला नष्ट करण्याचा कोणता प्रभावी मार्ग सापडत नाही तोपर्यंत यापासून बचाव करणे हेच एकमेव याचे निदान आहे. संशोधकांच्या मते सार्वजनिक शौचालयही कोरोना पसरण्यास कारणीभूत आहेत. एका नवीन संशोधनानुसार, सार्वजनिक शौचालयामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.

‘फिजिक्स ऑफ फ्लुइड्स’ या जर्नलमध्ये चिनी संशोधकांनी असा दावा केला आहे की सार्वजनिक शौचालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो. जेव्हा याचा वापर केला जातो आणि यानंतर फ्लश केले जाते तेव्हा कोविड -19 चे लहान विषाणू हवेत सहा सेकंदांपेक्षा कमी कालावधीच्या आत दोन फूटांपर्यंत वर उठतात. अशा परिस्थितीत जेव्हा फ्लश चालतो, तेव्हा हवेवर फोर्स येतो, त्यानंतर जर कोमोडमध्ये आधीच संसर्गित विषाणू असल्यास ते हवेत पसरतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच सार्वजनिक शौचालयांमध्ये विषाणूची लागण होण्याची शक्यता अधिक आहे, हे संशोधकांनी सांगितले आहे.

चीनमधील यंग्झहू विद्यापीठाचे तज्ञ जिआंगडोंग लिऊ म्हणाले, आम्ही संगणकाच्या आधारे सार्वजनिक शौचालयात विषाणूच्या क्रियांचा रोडमॅप तयार केला आहे ज्यामुळे विषाणू कसा आणि किती दूर पसरतो हे आम्हाला कळाले आहे.’ शौचालय वापरल्यानंतर जेव्हा आपण फ्लश करतो, तेव्हा गॅस आणि लिक्विड इंटरफेस दरम्यान एक संपर्क तयार होतो. याचा परिणाम म्हणून युरिनलपासून एरोसोल कणांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो, संशोधकांनी याकडे बारकाईने पाहिले आणि त्यांची तपासणी केली.

शौचालयात फ्लशिंग दरम्यान उत्सर्जित होणारे लहान कण जास्त प्रमाणात पसरत असल्याचे तपासणीत आढळले. या रेणूंमध्ये 57 टक्के असे कण असतात ज्यांचा प्रसार शौचालयाच्या स्थानापासून बऱ्याच दूरपर्यंत होतो. संशोधनानुसार जेव्हा पुरुष सार्वजनिक शौचालय वापरतात, तेव्हा हे लहान कण त्यांच्या मांडीपर्यंत जाण्यासाठी फक्त 5.5 सेकंदाचा कालावधी घेतात, यापासून थोडे वरपर्यंत जाण्यासाठी 35 सेकंद लागतात. संशोधनात असे सूचित केले गेले आहे की कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये मास्क वापरणे आवश्यक आहे. शौचालय वापरताना देखील ,मास्क वापरण्यास विसरू नये.