आरोग्य निरीक्षक 1,50,000 ची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  खाद्य प्रदार्थ विक्रीचा परवान्यासाठी अनुकुल अहवाल देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मुंबई महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. परेश चंद्रकांत कोरगांवकर ( ५६, नार्थ वॉर्ड, बृहनमुंबई महापालिका, मालाड (पश्चिम) असे या आरोग्य निरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांचे भूमी मार्ट या नावाने दुकान आहे. त्या ठिकाणी ते खाद्य पदार्थांची विक्री करतात. त्यांना खाद्य पदार्थ विक्रीसाठी महापालिकेच्या संबंधित वॉर्ड कार्यालयाकडून परवाना आवश्यक होता. त्यासाठी त्यांनी मालाडच्या वॉर्ड कार्यालयात अर्ज केला होता. परेश कोरगांवकर याने त्यावर अनुकुल अहवालद्वारे लायसन्स देण्याकरीता त्यांच्याकडे दीड लाख रुपयांची लाच मागितली.

दुकानमालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची पडताळणी केल्यानंतर त्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सोमवारी सायंकाळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी मार्ट या ठिकाणी सापळा रचला. परेश कोरगांवकर हा दीड लाख रुपयांची लाच घेण्यासाठी दुकानात आला असताना पैसे स्वीकारताना त्याला पकडण्यात आले.

फेसबुक पेज लाईक करा –