46 वर्षांची मलायका स्वत:ला फिट ठेवण्यासाठी करते ‘हँडस्टँड’ योग, अभिनेत्रीनं सांगितली ‘पद्धत’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार आणि फिटनेस फ्रिक मलायका अरोरा आपल्या चाहत्यांना योगाच्या प्रति प्रोत्साहित करण्यासाठी प्रत्येक सोमवारी एक योगासन शेअर करत असते. यावेळी तीन हँडस्टँड योग करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आपला फोटो शेअर करताना मलायकानं हँडस्टँड योगा कसा करावा हेदेखील सांगितलं आहे.

असा करा हँडस्टँड योग
सर्वात आधी अधोमुख श्वानासन करा. यानंतर हात परशीवर ठेवा. यानंतर हळूहळू पाय उचलायला सुरुवात करा. तुम्हाला तुमचं पूर्ण वजन तुमच्या हातावर द्यायचं आहे. हातात योग्य अंतर ठेवायला विसरू नका. आपल्या उजव्या गुडघ्याला फोल्ड करा. टाचा वर उचला. यानंतर डावा पाय उचला. आपले बायसेप्स पुढील बाजूला फोल्ड करा. डोळ्यांचं लक्ष हातांवर केंद्रीत करा. तुमचे दोन्ही पाय वर असतील पूर्ण वजन तुमच्या हातावर असेल. यानंतर पाय कैची प्रमाणे एकमेकांपासून दूर न्या. सतत श्वास घेत रहा. या आसानातून बाहेर येण्यासाठी आधी उजव्या पायाला खाली घ्या. यानंतर पाय खाली घ्या. यानंतर चाईल्ड पोजमध्येच थोडा वेळ आराम करा.

हँडस्टँड पोज करण्याचे फायदे

यामुळे मेंदूला ब्लड सर्क्युलेशन वेगानं होतं. याचा फायदा केसगळती कमी करण्यासाठी होतो.
एकाग्रता वाढण्यास मदत होते.
मेंदूला ऑक्सिजयुक्त रक्त जास्त प्रमाणात मिळतं. यामुळे मेंदूतील पिट्युटरी आणि पायनर ग्लँड उत्तेजित होतात. यामुळे डोकं शांत राहतं.
पचनसंस्था नीट काम करते. अॅसिडीटीची समस्याही नष्ट होते.