Coronavirus : ‘कोरोना’ संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत आता नवीन नियम, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संशयित रुग्णांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यानुसार आता कुटुंबाला शव देण्याआधी प्रयोगशाळेतील निकालांची गरज लागणार नाही.

मंत्रालयाने रविवारी दिल्ली सरकारला पत्र लिहिले की कोरोनामुळे संशयित रुग्णांच्या लॅबच्या निकालाची वाट न पाहता कुटूंबाकडे सोपवावा, मात्र अंत्यसंस्कार हे सरकारने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार होईल. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही एका ट्विटद्वारे लोकांना याबद्दल माहिती दिली. कोरोना संशियत रूग्णांचे मृतदेह कुटूंबाकडे देण्यासाठी रिपोर्टची वाट पाहू नये, अशी माहितीही गृह मंत्रालयाकडून ट्वीटद्वारे देण्यात आली आहे. तसेच मृतदेहाच्या अंत्यसंस्कारची पूर्ण खबरदारी घ्यावी असेही म्हटले आहे.

या व्यतिरिक्त कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक (9115444155) देखील जारी केला आहे. या क्रमांकावर कॉल करून, ओपीडी नेमणुका आणि वॉलंटियर्सशी बोलू शकता. याव्यतिरिक्त, दिल्ली एम्समध्ये आरोग्य मंत्रालयाने एक कॉल सेंटर देखील तयार केले आहे, जेणेकरुन इथले डॉक्टर देशभरातील इतर डॉक्टरांना उपचारासाठी सल्ला देऊ शकतील.