Coronavirus : ‘कोरोना’ सडपातळ लोकांना जास्त होतो का लठ्ठ मनुष्यांना आणि काय सांगतं संशोधन, जाणून घ्या

नवी दिल्ली – कोरोना महामारी पसरत असतानाच तिच्या परिणामांचा जगभर अभ्यास केला जात आहे. ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनात असं लक्षात आलं आहे की कोरोनाबाधितांमध्ये ज्यांची शरीरयष्टी लठ्ठ आहेत अशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 33 टक्के अधिक आहे. 17 हजार जणांवर केलेल्या प्रयोगांतून शास्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 30 हून अधिक आहे, अशा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

ब्रिटनमध्ये आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे सर्वेक्षण केले तर त्या रुग्णांमध्ये 34.5 टक्के लोक ओव्हरवेट आणि 31.5 टक्के लोक लठ्ठ असल्याचे लक्षात आले. वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या म्हणण्यानुसार कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांत बीएमआय 25पेक्षा जास्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अमेरिका, इटली आणि चीनमध्येही हे लक्षात आलं की कोरोना होण्यासाठी जास्त बीएमआय असणं हे एक प्रमुख कारण आहे.