अशी करा डोळ्यांची देखभाल, दूर राहतील ‘हे’ 7 आजार, अन्यथा महागात पडेल छोटीशी चूक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डोळ्याच्या अशा अनेक समस्या आहेत, ज्या वेळीच योग्य उपचार केल्यास रोखता येऊ शकतात. तसेच डोळ्यांची योग्य काळजी घेणेसुद्धा तेवढेच आवश्यक आहे. डोळ्यांची देखभाल करण्यासाठी जास्त काही करावे लागत नाही. रोजच्या अशा काही सवयी लावून घ्या, ज्यामुळे डोळ्यांच्या समस्या आणि आजार दूर राहतील. या सवयी कोणत्या आणि डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, ते जाणून घेवूयात.

हे आहेत डोळ्यांचे सामान्य आजार

1 खाज, जळजळ
2 पापण्या अडकणे
3 कंजेक्टिवायटिस
4 कोरडेपणा
5 डोळ्यात पाणी येणे
6 कॉर्नियामध्ये अल्सर
7 अ‍ॅलर्जी

अशी घ्या काळजी

1 व्हिटॅमिन आणि मिनरल्स

आहारात योग्य व्हिटॅमिन आणि मिनरल्स मिळवण्यासाठी रंगीत भाज्या आणि फळे जसे की, पालक, ब्रोकली, गाजर आणि बीट यांचा समावेश करा. याशिवाय, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असलेले पदार्थ सेवन करा.

2 लेन्स किंवा चष्मा

नेहमी प्रोटेक्टिल आयवियर वापरा. पॉली कार्बोनेटद्वारे तयार आयवियरचा वापर करा. हे डोळ्यांच्या दुर्घटनांपासून बचाव करतील.

4 सनग्लासेस

उन्हात जाताना सनग्लासेसचा वापर करा. यामुळे डोळ्यांची हानी होत नाही.

5 सतत डोळ्यांना स्पर्श

डोळ्यांत अ‍ॅलर्जी अनेक कारणांमुळे होते, परंतु सर्वात सामान्य कारण आहे, डोळ्यांना सतत स्पर्श करणे. ही सवय बंद करा. डोळे स्वच्छ पाण्याने सकाळ-संध्याकाळ साफ करा.

6 अनुवंशिकता

डोळ्यांच्या मॅक्यूलर डिजनरेशन, ग्लूकोमा, रेटिना डिजनरेशन आणि ऑप्टिक ऐट्रफी या समस्या अनुवंशिक आहेत. यासाठी कुटुंबाचा इतिहास तपासा.