रक्ताची कमतरता अन् पोट साफ न होण्याची समस्या दूर करतो ‘मका’ ! इतर फायदे वाचाल तर अवाक् व्हाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अनेकांना भाजलेला मका लिंबू पिळून खायला खूप आवडतो. याशिवाय मक्याची भेळ, उकडलेला मका, मक्याचं पॅटीस आणि मक्याची भजीही लोकं आवडीनं खात असतात. अनेकजण भातात मक्याचे दाणे वापरतात. अनेकांना माहित नसेल की, यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय आरोग्याला खूप सारे फायदे मिळतात. यानं पोटही साफ होतं. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) डोळ्यांसाठी फायदा – मक्यात व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरेटीन असतं. यामुळं डोळ्यांना खूप फायदा मिळतो. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. अँटी ऑक्सिडेंट्स म्हणून याचं सेवन केलं जातं. कारण याच्या सेवनानं शरीरातील अँटी ऑक्सिडेंट्सचं प्रमाण हे 50 टक्क्यांनी वाढतं.

2) ऊर्जा मिळते – मक्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असतं. यामुळं शरीराला खूप ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखं वाटत असेल किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश आवश्य करा. यामुळं पोटही लवकर भरतं आणि तुमचा उत्साह देखील टिकून राहतो.

3) रक्ताची कमतरता दूर होते – मक्याचं कणीस जर तुम्ही खाल्लं तर शरीरातील हिमोग्लोबिन आणि रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय यामुळं पोट साफ होण्यासही मदत होते.

4) हाडं बळकट राहतात – जर तुम्ही मका खाल्ला तर हाडांना बळकटी मिळते. मक्यातील आयर्न, मॅग्नेशियम ही तत्व हाडांना मजबूत करतात. यात झिंक आणि फॉस्फरस यांचंही प्रमाण असतं. यामुळं वाढत्या वयात उद्भवणाऱ्या हाडांच्या समस्यांपासून आराम मिळतो.