Health Tips : ‘चंदना’मुळं त्वचेसंबंधित प्रत्येक समस्या होते दूर, त्वचेवर येते नवीन ‘चमक’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : चंदन हे एक सुगंधी लाकूड आहे जे आयुर्वेदात बर्‍याच उपचारांसाठी वापरले जाते. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे याचा उपयोग त्वचेसंबंधित अनेक समस्यांमध्ये जसे की पुरळ, स्किन टॅन पासून ते एजिंग सारख्या समस्यांमध्ये देखील केला जातो. चंदनामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म असतात जे जखमा बरे करण्यास मदत करतात. यामुळे चेहरा मऊ आणि चमकदार होतो तसेच त्वचेसंबंधित अनेक समस्यांचे समाधान देखील होते. आज आपण आपल्या त्वचेवर चंदन पॅक लावण्याचे फायदे काय आहेत त्याबाबत जाणून घेऊया.

चंदनाचे फेस पॅक-

डल स्किनसाठी फेस पॅक

यासाठी 1/2 चमचा चंदन पावडर, 1 चमचा मध आणि 1 चमचा गुलाब पाणी घेऊन ते मिसळा. याने हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करा आणि 10-15 मिनिटे ते तसेच राहूद्या. यानंतर नॉर्मल किंवा हलक्या कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे डल व ड्राय स्किन, पिंपल्स, सैल त्वचा आणि अँटी-एजिंग या सर्व समस्या दूर होतील.

ब्लॅकहेड्स आणि पुरळसाठी फेस पॅक

पुरळ, चट्टे आणि ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी एक चमचा चंदनाच्या तेलामध्ये एक चिमूटभर हळद आणि कापूर घाला. हा फेस पॅक रात्रभर चेहऱ्यावर लावलेला राहू द्या. आपणास वाटले तर 1 टेबल स्‍पून चंदन पावडर, 1 टेबल स्‍पून नारळाचे तेल आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवू शकता. अर्ध्या तासासाठी ही पेस्ट चेहर्‍यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

डार्क स्पॉट्सचा डार्क सर्कल फेस पॅक

यासाठी आपल्याला दोन चमचा चंदन पावडर आणि गुलाबाचे पाणी मिसळून प्रभावित भागावर लावावे लागेल. त्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा. दररोज असे केल्याने डार्क सर्कल आणि चेहऱ्यावरील डाग अदृश्य होतात.

अँटी-एजिंग फेस पॅक

यासाठी आपण एक चमचा चंदन आणि बदाम पावडरमध्ये दूध मिसळा. नंतर 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. त्वचा चमकण्यासाठी आणि सुरकुत्या दूर करण्यासाठी दररोज ही पेस्ट लावा. आपल्याला काही काळातच फरक दिसून येईल.

सनटॅनसाठी फेस पॅक

यासाठी काकडीच्या रसामध्ये एक चमचा दही, एक चमचा मध, काही थेंब लिंबाचा रस आणि एक चमचा चंदन पावडर मिसळा. मग हा फेस पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा. यामुळे चेहर्‍यावरील डार्क स्पॉट आणि सनटॅन काढण्यास मदत होईल.

मऊ त्वचेसाठी फेस पॅक

यासाठी चंदन पावडरमध्ये बदाम आणि नारळ तेल मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आठवड्यातून 2-3 वेळा हा पॅक लावल्याने त्वचा कोमल व मऊ होते.

तेलकट त्वचेसाठी फेस पॅक

यासाठी चंदन पावडरमध्ये गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब घाला आणि ते आपल्या चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासासाठी त्यास चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.