‘या’ 4 चुकीच्या सवयींमुळे शरीराचेच नव्हे, तर मेंदूचेही होऊ शकते नुकसान

पोलिसनामा ऑनलाइन – निरोगी राहण्यासाठी शारीरीकच नव्हे, तर मानसिक आरोग्य देखील खुप महत्वाचे असते. कारण मानसिक आरोग्य चांगले नसेल तर त्याचे शरीरावर खुप गंभीर परिणाम दिसून येतात. मानसिक आरोग्याचे परिणाम हे शरीरासह एकुणच जीवनावर दिसून येतात. मेंदू हा महत्वाचा अवयव आहे. त्याच्यावर नकारात्मक परिणाम झाल्याने स्मृती, संवेदना यावर परिणाम होतो. हे टाळणे आवश्यक असतात. काही चुकीच्या सवयीमुळे आपल्या मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होत असतो, या सवयी कोणत्या ते जाणून घेवूयात…

या सवयी टाळा

1 उशीरा झोपणे
उशीरा झोपणे टाळा. कारण यामुळे स्लिप सायकल डिस्टर्ब होते. शिवाय आजारी पडण्याची शक्यता वाढते. हदयासंबंधी आजारांचा धोका वाढतो. याचे मेंदूवरही वाईट परिणाम होतात. उशीरा उठल्याने शरीरासोबतच मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त झोपल्यानं लठ्ठपणा,डोकेदुखी, कमेरेचे दुखणं उद्भवू शकते. यासाठी कमी किंव जास्त झोप घेण्याऐवजी योग्य कालावधीची झोप घेतली पाहिजे.

2 मोबाईल अति वापर
झोपताना टिव्ही, मोबाईल बघू नका. कंम्प्यूटर किंवा मोबाईलचा वापर करत जेवण करू नका. यामुळे ओव्हरइटींग होते शिवाय डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. रात्री झोपण्याच्या 1 तास किंवा 2 तास आधी मोबाईलपासून दूर व्हा.

3 नाश्ता न करणे
कामाची घाई आणि वजन कमी करण्यासाठी अनेकण नाश्ता करत नाहीत. नाश्ता शरीराला दिवसभर उर्जा देतो आणि निरोगी ठेवतो. नाश्ता न केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम घडून येतो. यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर पौष्टिक नाश्ता करा. भरपूर पाणी प्या.

4 साखरेचे अतिसेवन
साखरेचे अति सेवन केल्याने विविध शारीरीक समस्या होऊ शकतात. शिवाय याचा मेंदूवरही वाईट परिणाम होऊ शकतो. कारण साखरेच्या जास्त सेवनाने रक्तात पोषक तत्वांची कमतरता जाणवते. जास्त साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने स्मरणशक्ती तसचं विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते.