Healthy Diet | हेल्दी डाएटमध्ये लपले आहे दिर्घायुष्याचे रहस्य, रिसर्चमध्ये झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Healthy Diet | आपल्या खाण्यापिण्यावर आपल्या जीवना (Life) चे अस्तित्व टिकून असते. तुम्हाला माहीत आहे का आहारा (Diet) शी वया (Age) चा संबंध असू शकतो. सर्वसाधारणपणे आपण असे मानतो की जेव्हा मृत्यू (Death) ला सामोरे जावे लागते तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही, परंतु नवीन वैज्ञानिक संशोधन (Scientific research) हे नाकारण्यावर भर देते. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की आहारात बदल (dietary changes) केल्याने व्यक्तीचे आयुष्य 13 वर्षांनी वाढू शकते. (Healthy Diet)

 

पीएलओएस मेडिसिन (PLOS Medicine) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, वया (Age) च्या 20 व्या वर्षापासून आहारात योग्य बदल केले तर वयात आणखी 10 वर्षे जमा होऊ शकतात. अभ्यासानुसार, वयाच्या 20 व्या वर्षी आहारात योग्य बदल केल्यास महिलांचे आयुष्य 10 वर्षांनी वाढू शकते तर पुरुषांचे आयुष्य 13 वर्षांनी वाढू शकते.

 

कोणत्याही वयात आहार सुधारणा महत्वाची :
संशोधनात असेही म्हटले आहे की जर तुम्हाला आहारात बदल करून जास्त काळ जगायचे असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावर उशीर झालेला नसतो. वयाच्या 60 व्या वर्षी योग्य आहाराकडे वळल्यास महिलांचे वय आठ वर्षांनी आणि पुरुषांचे वय नऊ वर्षांनी वाढू शकते. (Healthy Diet)

 

80 व्या वर्षीही आहारात सुधारणा करून वय वाढवता येते. अभ्यासानुसार, वयाच्या 80 व्या वर्षी आहारात सुधारणा करून, एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सरासरी 3.5 वर्षे वाढू शकते.

 

चांगला आहार म्हणजे काय
हे संशोधन नॉर्वेतील बर्गन विद्यापीठातील (University of Bergen, Norway) संशोधकांनी केले आहे. संशोधनानुसार, चांगल्या आहारासाठी एक मॉडेल विकसित करण्यात आले आहे. या मॉडेलनुसार व्यक्तीचा आहार ठरवला जातो. म्हणजेच, हे मॉडेल ठरवते की एखाद्याचा आहार कसा असावा जेणेकरून त्याचे वय वाढेल.

 

सर्वसाधारणपणे, आहारात बीन्स, धान्य आणि बदाम इत्यादीचा समावेश आयुष्य वाढवण्याचा उपाय आहे. दुसरीकडे, रेड मीट आणि प्रोसेस्ड मीटचे सेवन जितके कमी होईल तितके वय वाढत जाईल.

खबरदारी आवश्यक :
अपोलो हॉस्पिटल मुंबईच्या डॉ. जिनल पटेल (Dr Jinal Patel) म्हणाले की, निरोगी आयुष्यासाठी ताजी फळे, भाज्या, शेंगा, काजू, धान्ये आणि कडधान्यांचा आहारात विशेष समावेश केला पाहिजे.

 

ते म्हणाले की, जेवणाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे कारण
ते शरीर संतुलित ठेवते आणि विविध रोग, अ‍ॅलर्जी आणि गुंतागुंतीच्या स्थितीपासून दूर ठेवते.
मांस, प्रक्रिया केलेले मांस, जंक फूड, फॅटी फूड, पॅकबंद अन्न इत्यादींमुळे कर्करोग आणि हृदयविकार होतो.
त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे.

 

आजकाल प्रक्रिया केलेल्या किंवा पॅकेज केलेल्या अन्नमध्ये भरपूर कॅलरीज असतात जे लठ्ठपणाचे कारण ठरू शकतात.
यामुळे मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि रक्तदाब वाढू शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Healthy Diet | dietary changes can improve your age know the best diet of longevity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘पैशांची खेळी करता येत नव्हती म्हणून…’

 

Low BP | अचानक कमी झाला ‘ब्लड प्रेशर’ तर असा करा नॉर्मल, जाणून घ्या

 

How To Control Blood Sugar Level | ‘या’ एका घरगुती वस्तूने कमी होईल Diabetes आणि Cholesterol ची समस्या; खर्च करावे लागणार नाहीत जास्त पैसे