Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला; म्हणाले – ‘पैशांची खेळी करता येत नव्हती म्हणून…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष निवड ही लोकांमधून होणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला गेला तर त्यानंतर पैशांची खेळी करता येत नव्हती, म्हणून त्यांनी तो निर्णय बदलला होता, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिले.

 

सरपंच (Sarpanch) आणि नगराध्यक्ष (Mayor) निवडीचा निर्णय आम्ही थांबवला आहे. कारण थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला गेला तर त्यानंतर पैशांची खेळी करता येत नव्हती हे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीच्या लक्षात आलं होतं. त्यावेळी सर्वात जास्त नगराध्यक्ष आमचेच लोक निवडून जात होते. त्यांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी हा निर्णय रद्द केला होता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी करत अजित पवारांना टोला लगावला.

 

तसेच मुळात महाराष्ट्रातचं नाहीतर सगळ्याच राज्यांमध्ये थेट सरपंचाची निवडणूक (Sarpanch Election) होत आहे.
काही राज्यामध्ये महापौरांचीही लोकांमधून निवडणूक होत असते.
आमच्या डोळ्यापुढे महापौरांची निवड नाही, फक्त उदाहरण सांगतोय.
त्यामुळे अजितदादा जे बोलतायत ते पराभव दिसत असल्यामुळे बोलत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | BJP leader devendra fadnavis criticizes ncp ajit pawar over sarpanch election

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा