Heart Attack | पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचा धोका महिलांपेक्षा जास्त का? हैराण करणारे आहे कारण; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Attack | ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नने वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने (Shane Warne Heart Attack) जगाचा निरोप घेतला. शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) लवकर मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ही समस्या पुरुषांमध्ये जास्त दिसून येते. (Why Men Are More Prone To Heart Attack Than women)

 

महिलांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अहवालानुसार, हृदयरोगामुळे दरवर्षी सर्वाधिक मृत्यू होतात.

 

अमेरिकेत दरवर्षी सुमारे 7 लाख 35 हजार लोक हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडतात. सुमारे 1.25 दशलक्ष लोकांना प्रथमच हृदयविकाराचा झटका येतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनचा दावा आहे की पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका स्त्रियांपेक्षा जास्त असतो. (Heart Attack)

 

2016 मध्ये JAMA Internal Medicine मध्ये प्रकाशित झालेल्या नॉर्वेच्या ट्रॉम्सच्या अभ्यासानुसार, विशिष्ट वयात स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता जवळजवळ दुप्पट असते.

 

हे शोधण्यासाठी, संशोधकांनी सुमारे 34,000 स्त्री-पुरुषांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले. तसेच 1979 ते 2012 पर्यंत हृदयविकाराचा झटका आलेल्या सुमारे 2,800 लोकांवर लक्ष ठेवले.

 

कोलेस्टेरॉल लेव्हल, हाय ब्लड प्रेशर, डायबिटिज, हाय बॉडी मास इंडेक्स (Cholesterol Level, High Blood Pressure, Diabetes, High Body Mass Index) आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीकडे बारकाईने पाहिल्यानंतर, संशोधकांना असे आढळले की जोखीमचे हे सर्व घटक हार्ट अटॅकमध्ये मोठ्या जेंडर गॅपचे अंतर दर्शवत नाहीत. मग महिलांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण काय?

महिलांना वाचवते इस्ट्रोजेन
जॉन हॉपकिन्स सिकारॉन सेंटर फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीज येथील क्लिनिकल रिसर्चचे संचालक मायकेल जोसेफ ब्लाहा म्हणतात
की पुरुषांना स्त्रियांपेक्षा 10 वर्षे आधी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वयाच्या 45 व्या वर्षी पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

 

तर महिलांमध्ये 55 वर्षांनंतर जास्त शक्यता असते. खरं तर, रजोनिवृत्तीपूर्वी स्त्रियांचे एथेरोस्क्लेरोसिसपासून जास्त संरक्षण होते.
एथेरोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा (फॅटी डिपॉझिट) झाल्याने हृदयविकाराचा धोका वाढवतो.

 

मेनोपॉजसोबत कोणते बदल होतात?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, मेनोपॉजनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते.
मेनोपॉजपूर्व इस्ट्रोजेनची उच्च पातळी स्त्रियांना हृदयविकारापासून वाचवते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
यामुळेच वयाच्या 45 व्या वर्षी पुरुषांप्रमाणे महिलांना हृदयविकाराचा झटका येत नाही.

 

मात्र, ट्रॉम्सो संशोधनात इस्ट्रोजेनच्या सिद्धांताचे समर्थन करणारा कोणताही पुरावा नाही.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, मेनोपॉजनंतरही महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका पुरुषांपेक्षा कमी असतो.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Attack | shane warne heart attack why men are more prone to heart attack than women

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Phone Tapping Case | ‘संजय राऊत आणि खडसेंचा फोन टॅप झाल्याचं महाराष्ट्राच्या समोर आलं आहे, तत्कालीन मुख्यमंत्र्यांची चौकशी करावी’ – अमोल मिटकरी

 

HSC Board Exam | 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! इंग्रजीच्या पेपरमधील ‘हा’ प्रश्न चुकीचा सोडवला असेल तरीही मिळणार गुण

 

All India Pharmacist Association Maharashtra | अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्राजक्ता चव्हाण यांची निवड