पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’ रोगाचा धोका अधिक ; ‘ही’ असतात लक्षणे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – पुरूष आणि महिलांमध्ये हृदयरोगाची कारणे वेगवेगळी असू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. महिलांमध्ये आढळणारी लक्षणे ही वेगळी आहेत. महत्वाचे म्हणजे महिलांमधील लक्षणे लवकर लक्षात येतात. त्यामुळे वेळीच काळजी घेऊन महिला हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.
महिलांमध्ये दिसणारी हृदयविकाराची लक्षणे म्हणजे छातीत वेदना होणे, अस्वस्थ वाटणे ही होय. अनेकदा महिलांमध्ये या प्रमुख लक्षणांशिवाय अन्य काही लक्षणे दिसून येतात. यामध्ये डोकं, जबडा, खांदा दुखणे, धाप लागणे, एक किंवा दोन्ही हात दुखणे, मळमळ किंवा उलट्या होणे, घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, ही अन्य लक्षणे आहेत. ही लक्षणे अनेकदा हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असली तरीही ती अनेकदा तीव्र नसतात. काही वेळी ही लक्षणे मानसिक तणावामुळेही आढळतात.

महिलांना मुख्य धमन्यांमध्ये अडथळा येत नाही तर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या लहान-लहान वाहिन्यांमध्ये अडथळा येतो. त्याला हृदयरोग किंवा कोरोनरी मायक्रो वॅस्कुलर रोग म्हणतात. यावियतिरिक्त मानसिक तणावामुळेही हृदयविकार होऊ शकतो. मधुमेह असलेल्या पुरुषांपेक्षा मधुमेह असलेल्या महिलांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. महिलांमध्ये निराशेचे लक्षण आढळल्यास डॉक्टरांकडे गेले पाहिजे. हृदयरोगासाठी पुरुषांपेक्षा महिलांना धूम्रपान जास्त धोकादायक ठरते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची निम्न पातळी लहान रक्तवाहिन्यांमध्ये हृदयरोग विकसित करण्यासाठी धोकादायक घटक ठरते.