‘हृदयाच्या’ आत देखील असतो मेंदू… वैज्ञानिकांनी तयार केला 3D नकाशा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हृदयाला स्वतःचा एक मेंदू असतो हे खरे आहे. याची पुष्टी करण्यासाठी वैज्ञानिकांनी हृदयाचा 3 डी नकाशा तयार केला आहे. ज्यामध्ये हे देखील सिद्ध झाले आहे की हृदयाचा आत एक लहान मेंदू असतो. हा मेंदू केवळ आणि केवळ हृदयासाठी कार्य करतो. हृदयाच्या आत असलेल्या या मेंदूला इंट्राकार्डिएक नर्व्हस सिस्टम (Intracardiac Nervous System – ICN) असे म्हणतात. हा हृदयाचा बिग बॉस आहे. म्हणजेच हा जे बोलतो हृदय तेच करते. तो हृदयाच्या आत संचार प्रणाली सहजतेने चालू ठेवण्यास मदत करतो.

ही नर्व्हस सिस्टम हृदयाला तंदुरुस्त ठेवते. जेणेकरून ते योग्यरित्या कार्य करू शकेल. केव्हा किती रक्त पुरवायचे हे तो हृदयाला सांगतो. या मेंदूमुळे हृदय अनेक आजारांपासून बचावत असते. फिलाडेल्फियावर आधारित थॉमस जेफरसन विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ जेम्स शॉबर आणि त्यांच्या टीमने उंदरांच्या हृदयाचा अभ्यास केला. यानंतर नाइफ एज स्कॅनिंग मायक्रोस्कोपीने हृदयाचे तपशीलवार छायाचित्र घेण्यात आली.

त्यानंतर या छायाचित्रांच्या मदतीने हृदयाचा 3 डी नकाशा बनविला. हृदयाचे सर्व भाग या 3 डी नकाशामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. प्रत्येक मज्जातंतू आणि अवयव दिसत आहेत. येथे हृदयाचा मेंदू पिवळसर दिसत आहे. जेम्स शॉबर म्हणतात की या नकाशाच्या सहाय्याने हृदयरोगाच्या कोणत्या भागावर जास्त परिणाम होतो हे आम्ही शोधू शकणार आहोत आणि त्यानुसार त्याचा उपचार करणे देखील सोयीस्कर होईल.

जेम्स म्हणाले की हृदयाचा मेंदू हृदयाच्या वरच्या डाव्या बाजूला असतो. येथून ही आज्ञा हृदयाच्या उजव्या आणि डाव्या भागांच्या मज्जातंतूंकडे पाठविली जाते. हृदयाच्या डाव्या बाजूला ब्रेन न्यूरॉन्स अधिक असतात. येथूनच ते त्यांचे कार्य करतात. आता जेम्सची टीम शोधत आहे की सर्व पिवळ्या रंगाचे न्यूरॉन्स वेगळ्या पद्धतीने कार्य करतात की मग एकत्र कार्य करतात.

जेम्स शॉबर यांनी सांगितले की त्यांचा अहवाल 26 मे रोजी आय-सायन्स मध्ये प्रकाशित झाला होता. हा नकाशा न्यूरोलॉजी आणि कार्डियोलॉजी दरम्यान एक ब्रिज म्हणून कार्य करेल. या मदतीने जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांना हृदयाशी संबंधित आजारांवर उपाय शोधता येतील.