तुमचा ‘आधार नंबर’ करा सुरक्षित, चोरी होणार नाही पर्सनल माहिती, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आता बँक खाते सुरु करताना, नवे सिम खरेदी करताना किंवा अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करणे आवश्यक असते. याशिवाय आधारचे सत्यापन केल्यानंतरच दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात. यामुळे लोक आधार नंबरचा दुरुपयोग होईल की काय यामुळे मोठ्या प्रमाणात चिंतेत असतात. कारण आधारवर सर्वांचा डाटा आहे आणि तो अत्यंत महत्वाचा आहे. याचाच विचार करुन यूएआयडीएआयने आधार नंबर लॉक आणि अनलॉक करण्याचे फिचर आणले आहे. याचा वापर करुन तुम्ही आधार नंबरचा दुरुपयोग रोखू शकतात.

असे करता येईल आधार लॉक/अनलॉक –
यूएआयडीएआयने आधार लॉक/अनलॉक करण्याची सोपी प्रक्रिया उपलब्ध करुन दिली आहे. तुम्ही ऑनलाइन किंवा नोंदणीकृत मोबाइल नंबरवरुन मेसेज करुन या सुविधाचा लाभ मिळवू शकतात.

1) तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन एक निश्चित फॉर्मेटअंतर्गत 1947 वर एसएमएस पाठवून ओटीपी प्राप्त करु शकतात. तुमच्या मोबाइल नंबरवरुन तुम्ही GETOTP आधार नंबरचे शेवटचे चार अंक टाकून 1947 या नंबरवर पाठवू शकतात.

2) या मेसेजनंतर यूएआयडीएआय तुम्हाला ओटीपी मेसेज पाठवेल. हा ओटीपी सहा अंकांचा असेल.

3) यानंतर तुम्हाला LOCKUID असे टाकून आधार नंबरचे शेवटे चार अंका सहा अंकांच्या ओटीपी नंबरच्या फॉर्मेटमध्ये मेसेज करावा लागेल.

4) यानंतर यूएआयडीएआय तुमच्या आधार नंबरला लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर लॉक झाल्याचे कन्फर्मेशन मिळेल.

visit : Policenama.com