विधायक ! ‘संशोधन-विकास’ कार्यावर 10,000 कोटींचीची गुंतवणूक करणार ‘हीरो मोटो कॉर्प’

जयपुर : वृत्तसंस्था – भारताची प्रसिद्ध दुचाकी वाहन कंपनी हिरो मोटोकॉर्पने संशोधन-विकास आणि अन्य कार्यासाठी पुढील पाच-सात वर्षांत 10,000 करोड रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत कंपनी एक नवीन उत्पादन प्रकल्प सुद्धा उभारणार आहे. कंपनीच्या ‘व्हिजन 2020’ ची घोषणा करताना हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक पवन मुंजाल यांनी म्हटले की, हे वर्ष ‘भविष्यातील वाहतूकी’साठी असेल.

2030 पर्यंत कंपनीला शून्य कार्बन उत्सर्जन कंपनी करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. मुंजाल म्हणाले, आज आम्ही आमचे खर्च तर्कसंगत ठेवले आहेत. आम्ही आमच्या ‘भविष्यातील वाहतूक’साठी आणलेले व्हिजन 2020 साध्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पुढील पाच ते सात वर्षात आम्ही पर्यायी वाहतूकीसाठी संशोधन आणि विकास, अत्याधुनिक उत्पादन सुविधा, नेटवर्क विस्तार आणि जगभरात ब्रँड पोहचवण्यासाठी सुमारे 10,000 करोड रूपयांची गुंतवणूक करणार आहोत.