Hero MotoCorp ची मोठी ऑफर ! शेअर खरेदी केल्यावर मिळणार दुप्पट नफा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हीरो मोटोकॉर्पने मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना प्रति शेअर २५ रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. मार्च तिमाहीत कंपनीचा नफा १५ टक्क्यांनी घसरून ६२०.७१ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत कंपनीला ७३०.३२ कोटी रुपयांचा नफा झाला होता. बुधवारी कंपनीच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास एनएसई वर हिरो मोटो कॉर्पोरेशनचे शेअर ३.४२ टक्क्यांनी घसरून २,३०५ रुपये झाले होते. व्यापार सुरू झाल्यावर शेअरचा भाव २,३८० रुपयांवर होता. मग त्यात घट झाली.

कंपनीचा रेव्हेन्यू घसरला
मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल २०.८८ टक्क्यांनी घसरून ६,२३८.३९ कोटी रुपये झाला. यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीने १३.२३ लाख वाहनांची विक्री केली. त्या तुलनेत कंपनीने वर्षभरापूर्वी मार्चच्या तिमाहीत १७.८१ लाख वाहनांची विक्री केली होती.

कोविड-१९ महामारीमुळे अनेक योजना पुढे ढकलल्या
हीरो मोटोच्या बोर्डाने २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २५ रुपये डिव्हिडंड जाहीर केला आहे. हा फायनल डिव्हिडंड आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ पवन मुंजाळ म्हणाले की, कोविड-१९ महामारीमुळे अनेक योजना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र या अभूतपूर्व परिस्थितीतही आम्ही काम करत राहिलो. आता आम्ही उत्पादनाची गती वाढवणार आहोत.

सोशल डिस्टंसिंग आणि ग्रामीण भागातही चांगली मागणी वाढेल
रिलायन्स सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष मितुल शहा म्हणाले की, चौथ्या तिमाहीत हीरो मोटोकॉर्पची कामगिरी मार्जिनच्या बाबतीत निराशाजनक होती. याचे मुख्य कारण चौथ्या तिमाहीच्या शेवटी होणारे लॉकडाऊन आहे. आम्ही आशा करतो की, सोशल डिस्टंसिंग आणि ग्रामीण भागात चांगली मागणी यामुळे येत्या काळात हीरो मोटोला मदत होईल.