फायद्याची गोष्ट : Hero ची मोठी ऑफर ! स्कूटीवर 15000 आणि बाईकवर 10000 रूपयांचा मोठा डिस्काऊंट, लवकर घ्या ‘लाभ’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दुचाकी बनवणारी सर्वात मोठी कंपनी हीरो मोटोकॉर्प भारतात बीएस-४ स्कूटर-बाईकवर मोठी सवलत देत आहे. १ एप्रिलपासून देशभरात नवीन बीएस६ मानक लागू झाले आहे. सुप्रीम कोर्टाने वाहन उद्योगाला दिलासा देत लॉकडाऊन संपल्याच्या दहा दिवसांनंतर बीएस-४ वाहने विक्री करण्यास सूट दिली आहे. अशा परिस्थितीत ज्या कंपन्यांकडे अधिक इन्व्हेंटरी आहे, त्या कंपन्या चांगली ऑफर देऊन ग्राहकांना ऑनलाईन बुकिंग करण्याचा सल्ला देत आहेत.

बीएस-४ बाईकवर १० हजार आणि स्कुटरवर १५ हजार रुपयांपर्यंतची सूट
हीरो टू-व्हीलर कंपनी बीएस-४ बाईकवर १० हजार रुपयांपर्यंत सवलत देत आहे, तर स्कूटरवर १५ हजार रुपयांची डिस्काऊंट ऑफर देत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही सवलत सध्या ऑनलाईन बुकिंगवर उपलब्ध आहे. कारण लॉकडाऊनमुळे शोरूम बंद आहेत. होरो मोटोकॉर्पचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे सध्या बीएस-४ दुचाकी वाहनांचा सुमारे दीड लाखांचा स्टॉक आहे. ज्याची किंमत सुमारे ६०० कोटी रुपये आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, यातील काही स्टॉक अशा देशांत निर्यात केले जातील, जेथे बीएस-४ वाहनांच्या विक्रीवर बंदी नाही.

कोरोना विषाणूमुळे हीरो मोटोकॉर्पने १४ एप्रिलपर्यंत आपले प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीने यापूर्वी ३१ मार्च २०२० पर्यंत उत्पादन कामे पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. तर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशन (एफएडीए) चे म्हणणे आहे की, भारतात सुमारे ७ लाख बीएस-४ दुचाकी डीलर्सकडे पडून आहेत, ज्याची किंमत सुमारे ३,८५० कोटी रुपये आहे. फेडरेशनच्या म्हणण्यानुसार, त्यापैकी दीड लाख बीएस-४ दुचाकींची विक्री झाली आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांची नोंदणी झालेली नाही.