High Cholesterol Problems | हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येत 3 गोष्टींपासून अंतर ठेवा, अन्यथा हृदयरोगाला आमंत्रण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धकाधकीच्या जीवनशैलीत (Stressful Lifestyle) आणि असंतुलित आहारामुळे (Unbalanced Diet) कोलेस्ट्रॉलच्या वाढीची समस्या (High Cholesterol Problems) उद्भवू लागली आहे. उच्च कोलेस्ट्रॉल हृदयरोगाचा प्रमुख घटक म्हणून ओळखला जातो. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हा रक्तात आढळणारा मेणासारखा पदार्थ आहे. तो पेशींच्या निर्मिती प्रक्रियेस मदत करतो. मात्र त्याची पातळी अधिक वाढल्याने हृदयरोगासह (Heart Disease) अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये फॅट (Fat) जमा होऊ शकते, ज्यामुळे हृदयाला पुरेसे रक्ताभिसरण (Blood Circulation) होत नाही (High Cholesterol Problems).

 

उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) आणि हृदयरोगाचा अभ्यास करणार्‍या हॉवर्ड विद्यापीठातील (Howard University) तज्ज्ञांच्या पथकाने कोलेस्ट्रॉलच्या बेसुमार वाढीला प्रतिबंध करण्याच्या उपायांविषयी माहिती दिली आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी (Cholesterol Level) सामान्य ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, काय खावे हे जाणून घेणे अधिक महत्त्वाचे आहे (High Cholesterol Problems).

 

उच्च कोलेस्ट्रॉल असलेले सवर्च पदार्थ आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत, असे नाही. उदाहरणार्थ, अंड्यांमध्ये (Eggs) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते, परंतु त्यात प्रथिने (Protein) आणि इतर पोषक द्रव्ये (Nutrients) देखील आहेत. ते चांगले आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. मोठ्या प्रमाणात चरबी असलेल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. यामुळे केवळ आपले वजनच वाढत नाही तर रक्तवाहिन्यांध्ये अडथळे देखील येऊ शकतात.

 

लाल मांसाचे हानिकारक परिणाम (Harmful Effects Of Red Meat) –
लाल मांस (Red Meat) बर्‍याच जणांची प्रथम पसंती असू शकते, परंतु ते कमीतकमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. त्यांत चरबीचे प्रमाण जास्त असते. हा धोका लक्षात घेता लाल मांस खाणं अजिबात बंद करावं असं नाही, पण त्याचं जास्त सेवन करू नये. चिकन (Chicken) आणि माशांचे (Fish) सेवन करणे आपल्यासाठी अधिक आरोग्यदायी ठरू शकते.

तळलेले पदार्थ कमी खा (Eat Less Fried Foods) –
फ्रेंच फ्राईजपासून (French Fries) ते तळलेल्या पदार्थापर्यंत समोसे, पकोडे अशा तळलेल्या गोष्टींचं कमीत कमी सेवन करा. याच गोष्टींमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. जर खाणारच असाल तर तर तळण्यासाठी ऑलिव्ह ऑईलसारख्या (Olive Oil) हेल्दी तेलाचा वापर करा.

 

भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात (Baked Foods Can Be Harmful To Health)
तळलेल्या पदार्थांव्यतिरिक्त भाजलेल्या पदार्थांचे अतिसेवनही आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.
क्लीव्हलँड क्लिनिकमधील तज्ञांच्या मते, कुकीज (Cookies), केक (Cakes) आणि डोनट्स (Donuts) सारख्या बेक्ड पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
हार्वर्ड हेल्थकेअरमधील तज्ज्ञांनी तर, आपण निरोगी शरीरासाठी आहाराची निवड मोठ्या काळजीने करावी, असे सूचवले आहे.
चुकीच्या गोष्टींचे अति सेवन केल्यास विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- High Cholesterol Problems | how to lower cholesterol levels what not to eat in high cholesterol problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Juices For Kidney Stones | किडनी स्टोनच्या समस्येत उपयोगी आहेत ‘हे’ 3 ज्यूस, आजपासूनच डाएटमध्ये करा समावेश

 

Chronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या

 

Fenugreek Seeds Health Benefits | मेथीच्या दाण्यांचे आश्चर्यकारक फायदे, हृदय आणि मधुमेहासाठी वरदान; जाणून घ्या