शूटिंगदरम्यान अभिनेत्री हिना खान जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उरी फेम विकी कौशल याचा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघात झाल्याची बातमी ताजी असताना आता ‘बिग बॉस 11 फेम अभिनेत्री हिना खानबरोबर असेच काहीसे घडले आहे. टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की 2’ च्या सेटवर शूटिंगदरम्यान तिला भाजले असल्याचे वृत्त आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, टिव्ही शो ‘कसौटी जिंदगी की 2’ च्या सेटवर शूटिंग सुरु होते यावेळी हीना एका सीक्वेंसचे शूटिंग करत होती. तेव्हा अचानक आग लागली. या आगीच्या कचाट्यात हीना खान सापडली. या घटनेत तिचा हात भाजला असून त्यानंतर तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर त्वरित उपचार करण्यात आले.

काही दिवसांपूर्वी हिना खानने खुलासा केला होता की लवकरच ती ‘कसौटी जिंदगी की 2’ मालीका सोडणार आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी देखील याबाबत सांगितले होते. आता मे महिन्यापासून हिना या मालिकेतून दिसणार नाही. लवकरच ती ‘लाईन्स’ या नव्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यामुळे ती मालिकेला वेळ देऊ शकत नाही म्हणून लवकरच ती मालिकेतून रजा घेणार आहे.

हिना खानने ‘अक्षरा बहु’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली. हिनाने काही वर्षानंतर ही मालिका सोडली आणि ‘बिग बॉस 11’ मध्येही झळकली. त्यानंतर तिने ‘खतरो के खिलाडी’ मध्ये देखील सहभाग घेतला होता.

Loading...
You might also like