Hindustani Bhau Arrested | विद्यार्थी आंदोलन प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hindustani Bhau Arrested | कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले…
Hindustani Bhau Arrested hindustani bhau alias vikas phatak arrested by dharavi police in connection with student in mumbai
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Hindustani Bhau Arrested | कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. शाळा महाविद्यालये सुरु झाली असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले होते. मात्र, परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेरही हे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हिंदुस्तानी भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकास पाठकला (Hindustani Bhau Alias Vikas Phatak) धारावी पोलिसांनी (Dharavi Police) अटक केली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (Hindustani Bhau Arrested)

 

विकास पाठकने इंस्टाग्रामवर ३० जानेवारीला एक व्हिडीओ शेअर केला होता.
त्यामध्ये त्याने आपल्या चाहत्यांना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराचा पत्ता सांगत आंदोलन किती वाजता आणि किती वेळा करायचे हे सांगितले होते.
दरम्यान, पोलिसांनी विकास पाठकवर विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप केला असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Hindustani Bhau Arrested)

 

गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
राज्य सरकारने महाविद्यालयांमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला असतानाही नागपूर, मुंबई, पुणे आणि बीडमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्यात आली.
एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यामुळे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी संशय व्यक्त केला आहे.
या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

यासंदर्भात बोलताना गृहमंत्री पाटील म्हणाले की, नोटीस न देता आंदोलन करणे अयोग्य आहे.
काही ठिकाणी मुलांनी आंदोलन केले. पण लाखो लोक मेसेज करत आहेत की परीक्षा घ्या, पण चुकीचा पायंडा पाडायचा नाही.
कमी गुणांचा पेपर घेतला जाऊ शकतो का याचा विचार करू शकतो.
पण परीक्षा घेऊ नये असं होणार नाही. मुलांना रस्त्यावर उतरवणं योग्य नाही.
हे कोणी केलं आहे त्याची गृहविभाग चौकशी करेल.
ज्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे त्या ठिकाणी गर्दी नियंत्रणात आणावी असे आदेश त्या त्या विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title :- Hindustani Bhau Arrested | hindustani bhau alias vikas phatak arrested by dharavi police in connection with student in mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Total
0
Shares
Related Posts