Hingoli Accident News | पोलिस भरतीचा सराव करताना कारची धडक लागून 19 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मुत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन – Hingoli Accident News | सध्या राज्यामध्ये पोलीस भरतीची तारीख जाहीर झाल्यामुळे मुले – मुली सरावाला लागले आहेत. या सरावादरम्यान एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. कन्याकुमारी कृष्णा भोसले (वय 19 वर्ष, आंबा, ता. वसमत) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती हिंगोली जिल्ह्यातील चोंढीफाटा ते औंढा मार्गावर पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करत होती. यादरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने कन्याकुमारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि कन्याकुमारी 10 ते 12 फूट उंच उडून खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. (Hingoli Accident News)

 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
वसमत तालुक्यातील आंबा येथील कन्याकुमारी भोसले व तिच्या दोन मैत्रिणी चोंढी फाटा ते औंढा मार्गावर पोलीस भरती जवळ आली म्हणून धावण्याचा सराव करीत होत्या. यावेळी दोन मैत्रिणी पुढे धावत होत्या तर कन्याकुमारी मागे होती. यादरम्यान एका पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या कारने कन्याकुमारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भीषण होती कि या धडकेमुळे कन्याकुमारी सुमारे 10 ते 12 फुट उंच उडाली अन् रस्त्यावर कोसळली. यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर कारचालक घटनास्थवरून फरार झाला. (Hingoli Accident News)

पुढे धावणाऱ्या मैत्रिणींना जोरात ओरडल्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी मागे पाहिले असता त्यांना आपली मैत्रीण कन्याकुमारी रस्त्यावर पडलेली दिसून आली.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तसेच पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे,
जमादार बालाजी जोगदंड, विनायक जानकर, ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कन्याकुमारी
यांचा मृतदेह वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. कुरुंदा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Hingoli Accident News | today hingoli 19 years old girl dies while running practice for police recruitment test after car hits

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kasba Bypoll Election Result | भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी

Pune Crime News | पत्नीवर वार करणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

SSC Exam | ऑल द बेस्ट! उद्यापासून 10 वीची परीक्षा सुरु, राज्यात 15 लाख 77 हजार विद्यार्थी देणार परीक्षा