Hinjewadi Crime News | पिंपरी : इंन्स्टाग्राम मेसेजला रिप्लाय, तरुणीच्या भावाकडून तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Hinjewadi Crime News | सोशल मीडियावर (Social Media) आलेल्या तरुणीच्या मेसेजला रिप्लाय केल्या प्रकरणी एका तरुणाला मुलीच्या भावाने व त्याच्या इतर मित्रांनी बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या तरुणाच्या काकांना देखील दगडाने मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि.17) दुपारी पावणे दोनच्या सुमारास कासारसाई येथील मोरया कॉलनीत (Morya Colony Hinjewadi) घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सदाशिव भिमाशंकर शिंदे (वय-26 रा. गणेश कॉलनी, कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन अक्षय सदाशिव सुरोसे (वय-22 रा. मोरया कॉलनी, कासारसाई) याच्यासह त्याच्या पाच मित्रांवर आयपीसी 143, 147, 148, 149, 326, 336, 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव यांना आरोपीच्या बहिणीने इंन्स्टाग्रामवर हाय असा मेसेज केला. या मेसेजला रिप्लाय म्हणून सदाशिव यांनी देखील हाय असा मेसेज पाठवला. हा मेसेज आरोपी अक्षय याचे वडिल सदाशिव सुरोसे यांनी पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांचे चुलते आश्रुबा शिंदे यांना सांगितले. चुलत्यांनी दोन्ही मुले आपली आहेत पुन्हा असे करणार नाहीत असे सांगून सदाशिव सुरोसे यांची समजूत काढली. मात्र त्यावेळी आरोपी अक्षय याच्या वडिलांनी सदाशिव शिंदे यांना मारहाण करणार असल्याची धमकी दिली.

रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास फिर्यादी सदाशिव शिंदे हे गप्पा मारत थांबले असताना आरोपी त्या ठिकाणी आले.
मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून अक्षय व त्याच्या मित्रांनी फिर्यादी यांना बाजूला नेले.
त्यावेळी फिर्य़ादी यांचे काका अश्रुबा शिंदे त्याठिकाणी आले.
ते आरोपींना समजून सांगत असताना अक्षय याने हातातील लोखंडी वस्तूने सदाशिवच्या डोक्यात मारहाण केली.
तर इतर पाच जणांनी त्याठिकाणी पडलेल्या दगडाने सदाशिवच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
तसेच फिर्यादी यांच्या काकाच्या छातीत दगड मारुन दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Court News | लाच प्रकरणात देवेंद्र खिंवसरा यांना अटकपूर्व जामीन

Indapur Firing Case | इंदापूर गोळीबार प्रकरण: सराईत गुन्हेगार अविनाश धनवेचा पुर्ववैमनस्यातून खून, ग्रामीण पोलिसांकडून 4 जणांना अटक (Video)

Pimpri Crime Branch Raid On Spa Center | पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, चार पीडित मुलींची सुटका

Nana Patole On Election Commission | नाना पटोलेंचा आयोगाला सवाल, गुजरातमध्ये एकाच टप्प्यात निवडणूका, मग महाराष्ट्रात…

Dacoity With Arms In Shirur Pune | शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू, वृद्ध गंभीर जखमी