होर्डींग दुर्घटना : आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जुना बाजार येथे काल (शुक्रवार) होर्डींग पडून ४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ७ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेतील दोषीला रेल्वे इंजिनियर संजय सिंह याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43c62d3e-c95e-11e8-a0aa-6315377a4d6b’]
पुण्यात सर्वात जास्त रहदारीचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शारीर अमर शेख चौकात २०१३ पासून अवैधरित्या होर्डिंग लावण्यात आले होते. होर्डिंग उभारताना पालिकेकडून २० फुटांची परवानगी असताना ४० फुटांचे होर्डिंग उभारण्यात आले होते. या संदर्भात रेल्वे प्रशासनाला वारंवार नोटीस देण्यात आली होती. शुक्रवारी रेल्वे प्रशासनाकडून होर्डिंग काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते. हे काम रेल्वे इंजिनियर संजय सिंह यांच्या निदर्शनात चालू होते, मात्र सुरक्षे कडे लक्ष न देता, तसेच हे होर्डिग वरुन कापण्या ऐवजी खालून कापण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी सिग्नलला उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर ते पडले. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c29b7325-c964-11e8-92d9-93254a36f7bd’]
याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात लोखंडी होर्डींग साचा कापणारे कामगार आणि संबंधित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भात रेल्वे इंजिनियरला दोषी ठरवत बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याला आज न्यायालयात हजर केला असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
[amazon_link asins=’B078LVWLJX,B07C2ZW7ZB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5d04613-c964-11e8-bf96-2780baac53d8′]
रेल्वेची उच्चस्तरीय चौकशी सुरू

या घटनेनंतर रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी शुक्रवारी संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याने घटना घडल्याचे स्पष्ट केले. तसेच समितीकडून या घटनेची चौकशी करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेचे उप मुख्य अभियंता ए. के. सिंग, उप मुख्य सुरक्षा अधिकारी शिवकुमार आणि उप मुख्य वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. थॉमस शनिवारी सकाळी मुंबई येथून पुण्यात आले आहेत. त्यांच्यासह पुणे विभागाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त डी. विकास यांनी या दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे. पुढील एक-दोन दिवसात समितीची चौकशी पुर्ण होण्याची शक्यता आहे. चौकशीमध्ये समिती कोणाला जबाबदार धरणार की नेहमीप्रमाणे कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर खापर फोडले जाणार याबाबत रेल्वे वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात आहेत.