घरातील ‘ही’ 6 कामे करुन राहा ‘स्लिम’ आणि ‘फिट’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी महागडे उपाय करण्यापेक्षा काही बिनखर्चाचे आणि सोपे घरगुती उपाय जास्त प्रभावी ठरू शकतात. जिम सुरू करणे, महागडे स्पेशल डाएट घेणे, महागडी औषधे घेणे, इत्यादी उपाय केले जातात. परंतु, एवढे महागडे उपाय करण्यापेक्षा घरातील काही खास कामे करुन तुम्ही वजन वेगाने कमी करू शकता. या कामांमुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि वजन कमी होते. घरातील ही कामे कोणती आणि त्यामुळे किती कॅलरीज बर्न होतात, ते जाणून घेवूयात.

ही कामे करा

1) जेवण बनवणे
स्वत: जेवण तयार केल्यास भरपूर कॅलरीज बर्न होऊ शकतात. शिवाय, जे हवे ते तुम्ही तयार करू शकता. जेवण तयार करतानाच्या पूर्ण प्रक्रियेदरम्यान उभे राहिल्याने साधारण 100 कॅलरीज बर्न करु शकता.

2) साफसफाई
स्वत: घराची साफसफाई केल्यास तुम्ही दररोज 125 कॅलरी बर्न करु शकाल.

3) पीठ मळणे
पीठ मळण्याचा फायदा म्हणजे याच्या मदतीने कॅलरी बर्न करु शकता. पीठ मळताना लागणारी ताकद आणि हातांची क्रिया यामुळे 50 कॅलरी बर्न करु शकता.

4) लादी पुसणे
लादी पुसताना शारीरिक हालचाल अधिक होते. स्क्वाट आणि क्रॉल हालचाल होते. तसेच कंबरेची सतत हालचाल होते. यामुळे फॅट कमी होते. दररोज घरात 20 मिनिटे लादी पुसल्यास 150 कॅलरीज बर्न होतात.

5) कपडे धुणे
ऑटोमॅटिक मशीनपेक्षा तुम्ही हातांनी कपडे धुतल्यास फिटनेसचे अनेक फायदे होतात. हाताने कपडे धुतल्याने 130 कॅलरी बर्न करु शकता.

6) भांडी घासणे
उभे राहून असो वा बसून भांडी घासल्याने सुमारे 125 कॅलरीज बर्न होतात.