खुशखबर ! खराब CIBIL स्कोर वाल्यांना देखील मिळणार होम लोन, मोदी सरकार करणार ‘हे’ काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून देशात मंदीची लाट सुरु आहे. मंदीमुळे देशातील अनेक अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. ज्यामध्ये ऑटो इंडस्ट्री आणि रियल इस्टेट क्षेत्रावर परिणाम झाला आहे. रियल इस्टेटशी संबंधीत उद्योगधंद्यावर मंदीचा परिणाम झाला आहे. आता यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने सरकारने कमी पत रेटिंग आणि खराब सिबिएल असलेल्यांना गृह कर्ज देण्याची योजना आखली आहे. यासाठी सरकार कमी पत रेटिंग असलेल्यांची हमी घेणार आहे. सरकारच्या हमीमुळे बँका देखील ग्राहकांना कर्ज देऊ शकतील.

काय आहे सरकारची ही योजना

कमी फी देऊन सरकारची हमी घ्या
मिळालेल्या माहितीनुसार गृह कर्ज घेऊ इच्छीणाऱ्या व्यक्तींना किरकोळ फी भरल्यानंतर सरकार गृह कर्जाची हमी घेऊ शकते. याचा फायदा कमी वयाच्या आणि ज्यांचे क्रेडिट रेटिंग खराब आहे अशा व्यक्तींना होणार आहे. खराब रेटिंगमुळे आपल्याला गृह कर्ज मिळणे अवघड आहे. त्यामुळे कमी वय असलेल्या व्यक्तींना घर मिळत नाही. मात्र, सरकारने उचललेल्या पावलामुळे गृह कर्जासाठी पात्र ठरणाऱ्या व्यक्तींचे व्याज कमी होणार आहेत.

मालमत्ता निधी तयार करण्याची योजना
याशिवाय रिअल इस्टेटला गती देण्यासाठी सरकारला रखडलेला प्रकल्प सुरू करायचा आहे. यासाठी सरकार स्ट्रेस्ड अ‍ॅसेट फंड तयार करण्याचीही योजना आखत आहे. जर ही योजनेला मूर्त स्वरूप आले तर या क्षेत्राशी संबंधित इतर व्यवसाय जसे की सिमेंट, स्टील, कच्चा माल इत्यादी मध्ये भरभराट होईल.

घर खरेदीदारांची संख्या वाढू शकते
घर विकत घेण्याचे लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार योजना तयार करण्याच्या विचारात आहे. या योजनेमुळे घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढू शकते आणि न विकलेल्या सदनिकांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.