Home Remedies : घसा खवखवतोय ? जाणून घ्या 5 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   हिवाळ्यात आपल्याला वारंवार घशात खवखवण्याची समस्या असते, ज्यावर आपण घरगुती उपचारांचा अवलंब करुन ठीक करू शकतो. वास्तविक, घशात खवखवण्याची समस्या श्वसन प्रणालीतील कोणत्याही गडबडीमुळे उद्भवते. जेव्हा घश्याच्या आतील भागात संसर्ग होतो तेव्हा घश्यात सूज, खोकला आणि खवखवण्याची समस्या होते. अश्या परिस्थिती असे काही घरगुती उपचार आहेत, ज्यांचा उपयोग करून आपण घश्यातील समस्या सुधारू शकतो.

– सर्वात आधी आपल्याला थंड गोष्टी टाळाव्या लागतील. तेलाने बनविलेले पदार्थ प्लेटमधून बाजूला काढाव्या लागतील. आपल्या सर्वांना माहित आहे की, चवीनुसार लिंबू खूप आंबट आहे. परंतु यामुळे घसा खवखवणे सुधारू शकते. घसा खवखवल्यास लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. आपण त्यात एक चिमूटभर मीठ आणि एक चमचे साखर देखील घालू शकता.

– असे म्हणतात की रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे बरेच फायदे आहेत. यात अ‍ॅलिसिन नावाचा घटक असतो जो संसर्ग दूर करण्यास प्रभावी आहे. आपण घसा खवखवल्यास त्याचे सेवन करू शकता. परंतु केवळ एक लसूण कळी घ्यावी

– वडीलधारे लोक नेहमी सांगतात कि, घसा खवखवत असताना मिठाच्या पाण्याने गुळणा करणे, प्रभावी असते. आपण दिवसातून दोनदा हे करू शकता.

– आले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत ज्यामुळे घशात जळजळ आणि वेदना कमी होते. आल्याचा वापर कोणत्याही स्वरूपात होऊ शकतो.

– जर एखाद्या व्यक्तीचा घसा खवखवत असेल तर तो मुलेठी देखील चघळू शकतो. किंवा आपण त्याची पावडर देखील घेऊ शकता. यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल.