प्रामाणिकपणाची किंमत चुकवावी लागते : निवडणूक आयुक्त अशोक लवासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला आहे. एका वृत्तपत्रातील लेखाच्या माध्यमातून त्यांनी म्हंटले कि, ‘ आपल्याला प्रामाणिकपणाची किंमत चुकवावी लागत आहे. जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी प्रामाणिकपणाची एक किंमत असते. भलेही ती किंमत थेट किंवा नुकसानीच्या स्वरुपात चुकवावी लागू शकते. ज्यांचा प्रामाणिकपणे आणि नम्रपणे विरोध करण्यात आला आहे. त्या लोकांकडून कोणतीही अपेक्षा ठेवणं मुर्खपणाचं आहे. प्रामाणिक लोकांना एकट्याला आपल्या कृत्याची किंमत चुकवावी लागते. कधी-कधी तर त्याला एकटे राहण्यास भाग पडत असल्याचं लवासा यांनी म्हंटल आहे.

लवासा पुढे म्हणतात कि, “जर एखाद्या लोकसेवकाने सार्वजनिक हिताशी तडजोडशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला बेईमानी ठरवलं जाऊ शकत नाही. तसेच वरिष्ठ स्तरावर विवेकाचा वापर गरजेचा असून कधी कधी नियमांद्वारे लोकांना भडकावणे अश्यक्य होऊन जाते,”

दरम्यान, अशोक लवासा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीनचीट देण्यास विरोध केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि बहिणीची प्राप्तिकर खात्यामार्फत चौकशी झाली होती.

तसेच काही दिवसांपूर्वीच प्राप्तिकर विभागाने लवासा यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीच्या विक्रीमध्ये स्टॅम्प ड्युटी चुकवल्याचा आरोप केला होता, या प्रकरणी चौकशीसाठी हरयाणा सरकारला पत्र लिहिले होते. मात्र, या चौकशीला लवासा कुटुंबियांनी चुकीची कारवाई असल्याचे सांगत आपल्या कुटुंबाला त्रास देण्याासाठी आणि बदनाम करण्यासाठीचा हा कट असल्याचे म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/