3 जून राशिफळ : जाणून घ्या बुधवारी कुणाकडे येणार ‘पैसा’, कुणाच्या पदरी येणार ‘निराशा’

मेष – आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात यश मिळेल. कामात लक्ष लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमाने बोलाल. कामात चांगले परिणाम मिळतील. प्रेमसंबंधात ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य कमजोर होऊ शकते. तब्येतीत सुधारणा होईल.

वृषभ – आजचा दिवस थोडा कमजोर आहे. मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल. खर्च वाढेल, परंतु उत्पन्नही मिळेल. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. बदलीचे योग आहेत. तुमच्या कामात कुटुंबातील सदस्यांची मदत होईल.

मिथुन – आजचा दिवस चांगला आहे. मुलांनाही वेळ द्याल. त्यांची काळजी घ्याल. त्यांच्यासोबत वेळ घालवणे आवडेल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. विवाहित लोकांच्या जीवनात तणाव असू शकतो. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील. कामात तुमचे कौतुक होईल.

कर्क – आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबासाठी वेळ द्याल. परिस्थितीशी लढण्याची सवय लागून घ्याल, ज्यातून आनंद मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम दिसून येईल. घरात चांगला वेळ घालवाल. व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. आरोग्य चांगले राहील. रागापासून दूर रहा.

सिंह – आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचा योग आहे, परंतु सावधगिरी बाळगा, कारण शारीरीक समस्या जाणवू शकतात. आरोग्य कमजोर राहील. खर्चातही वाढ होईल, ज्यामुळे नाराजी जाणवेल. उत्पन्न ठीक होईल. कुटुंबात सुख-शांती राहील. प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कमजोर आहे.

कन्या – आजचा दिवस चांगला आहे. पैशाच्या बाबतीत भाग्यवान ठराल. पैसे मिळतील. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. प्रिय व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. विवाहितांचे जीवन आज चांगले राहील. जोडीदारालाही फायदा होईल. व्यवसायात नफा होईल. भाग्य साथ देईल. नोकरीसाठी वेळ चांगली आहे. पदोन्नतीचे योग आहेत.

तुळ – आजचा दिवस चांगला आहे. प्रत्येक कार्य चांगल्या प्रकारे पार पाडाल. कामात मन लागेल. आरोग्य बळकट राहील. अचानक कुठूनतरी पैसे आल्याने परिस्थिती चांगली होईल. कुटुंबात तणाव राहील. पण त्यावर मात करण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. मेहनतीला यश लाभेल. विरोधकांवर मात कराल. प्रेमसंबंधात तणाव राहील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

वृश्चिक – आजचा दिवस कमजोर आहे. खर्च वाढेल. आरोग्यही नाजूक राहील. मानसिक ताण अस्वस्थ करेल, ज्यामुळे कामात व्यत्यय येऊ शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. एकमेकांबद्दल प्रेमाची जाणीव होईल. प्रेमसंबंधात आज दिलासा जाणवेल. एकमेकांशी मनातील बोलणे सोपे जाईल, यामुळे नात्यातील समजुतदारपणा वाढेल. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील.

धनु – आजचा दिवस चांगला आहे. आज कुठूनतरी पैसे येतील, जेणेकरून थांबलेले काम पुन्हा मार्गी लागेल. आनंदी व्हाल. आरोग्य ठिक राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. कुटुंबातील वातावरणही समंजस राहील. सर्वजण एकत्र बसून कुटुंबाच्या भल्याबाबत चर्चा करतील. प्रेमसबंधासाठी दिवस उत्तम आहे. रोमान्सची संधी मिळेल. एखाद्या समस्येमुळे वैवाहिक जीवन कमजोर राहील.

मकर – आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा आहे. आरोग्य बिघडू शकते, कारण तुम्ही मानसिक ताणतणाव असाल. यामुळे पोट खराब होण्याची शक्यता आहे. अपचनाचीही तक्रार जाणवू शकते. व्यवसायाला वेग येईल. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात मन लागेल. वैयक्तिक प्रयत्नातून यश मिळेल. प्रेमसंबंधात रोमान्सची संधी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस कमजोर आहे.

कुंभ – आजचा दिवस थोडा कमजोर आहे. आरोग्य कमजोर राहील, ज्यामुळे अस्वस्थ वाटेल. भाग्यामुळे अनेक कामे होतील. घरात आनंद राहील. कुटुंबासमवेत एकत्र वेळ घालवायला आवडेल. कुटुंबात मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे.

मीन – आजचा दिवस चढ-उतारांचा आहे. मनात अनेक प्रकारचे विचार येतील, जे तुम्हाला वेगवेगळया दिशेने विचार करण्यास प्रवृत्त करतील. यामुळे कामात अडथळा येईल. चिंता वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील, पण एखाद्या गोष्टीची भीती मनात राहील. उत्पन्न वाढेल. वैवाहिक जीवनात काळजी घ्यावी, जोडीदाराशी भांडण होऊ शकते. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like