कडक लॉकडाऊनमध्ये पुण्यातील कोंढव्यातील ‘हे’ हॉटेल सुरू होतं, दोघांवर FIR दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कडेकोट लॉकडाउन असताना देखील आर्थिक फायद्यासाठी कोंढव्यात हॉटेल सुरु ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी कारवाईकरून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनुज घनश्याम चौरसिया (वय ३४, रा. मंत्रा इरा सोसायटी, उंड्री) व प्रकाश ताराचंद खत्री (वय ३०, रा.उंड्री ) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने पुणे, पिंपरी चिंचवड शहर 10 दिवसांसाठी कडेकोट लॉकडाउन केले आहेत. परंतु शहर बंद असताना कोंढव्यातील हॉटेल नाईट क्रेवेर्स सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता, हॉटेलचे मालक अनुज आणि कुक प्रकाश उपस्थित असल्याचे दिसून आले. पैसे कमविण्याच्या उद्देशाने त्यांनी हॉटेल सुरु ठेवल्याची कबुली पोलिसांना दिली.