१५० घरफोड्या करणारा सराईत १९ वर्षानंतर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे आणि राज्यात तब्बल १५० च्या वर घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला १९ वर्षांनी अटक करण्यात पुणे गुन्हे शाखेला यश आले आहे. संजय नामदेव कांबळे (वय-४८ रा. गांधीनगर देहुरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शनिवारी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

पुणे परिसरात आणि राज्यामध्ये घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार संजय कांबळे हा तळेगाव दाभाडे येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक महेश निंबाळकर यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीवर समर्थ पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून या गुन्ह्यातील मिलींद पवार, निलेश चौगुले, सुभाष महामुनी आणि अनंत सिदाडकर यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. संजय कांबळे याच्यावर राज्यामध्ये १५० च्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल असून समर्थ पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये १९ वर्ष फरार होता.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश निंबाळकर यांच्या पथकाने केली. पुढील कारवाईसाठी आरोपीला समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !