चतुःशृंगी, येरवड्यात भरदिवसा घरफोडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा परिसर तसेच चतुःशृंगी येथुन चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले. दोन्हीत पावणे चार लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आजीमुद्दीन शेख (वय ४२, रा. आळंदी रस्ता ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख एका खासगी कंपनीत नोकरीस असून ते कामानिमित्त कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, टीव्ही, रोख रक्कम मिळून २ लाख १२ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभिम ननवरे अधिक तपास करीत आहेत.

तर चतुःशृंगीत चोरट्यांनी ३३ वर्षीय महिलेच्या घरातील कपाटातून दीड लाखांचे दागिने चोरुन नेले आहेत. २ ते १० नोव्हेंबर कालावधीत बाणेर रस्त्यावरील पुंगालिया हाउसमध्ये ही घटना घडली. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला गृहिणी आहेत. त्यांनी काही महिन्यांपुर्वी सोन्याचे दागिने खरेदी केले होते. त्यांनी दागिने कपाटात ठेवले. त्या २ ते १० नोव्हेंबर कालावधीत बाहेर गेल्यानंतर दीड लाखांचे दागिने चोरुन नेले. महिलेने १० नोव्हेंबरला कपाट उघडले असता, त्यांना दागिने दिसून आले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे अधिक तपास करीत आहेत.

Visit : Policenama.com