कपड्यांचे दुकान फोडून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्याचे सत्र सुरूच असून, वानवडीत बंद कपड्याचे दुकान फोडून चोरट्यांनी १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला.

याप्रकरणी श्रेया मखिजा (वय २३, रा. कोंढवा) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडीतील साळुंके विहारमधील गिरमे हाईट्स इमारतीत श्रेया यांचे जॉकी एक्सक्लुसिव शोरुमसह मुकीन युनिसेक्स दुकान आहे. दोन दिवसांपुर्वी दोन्ही दुकान बंद करुन श्रेया घरी गेल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह मोबाईल, दोन मनगटी घड्याळे असा मिळून १ लाख १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भगवान कांबळे अधिक तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –