चीनच्या गुप्तहेरांचं नेटवर्क खुपच ‘जबरदस्त’, हार्वर्डच्या प्राध्यपकापासून नेत्यांपर्यंत त्यांचे ‘एजंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि चीनमध्ये कोरोनापासून सुरू झालेला तणावात आता भर पडली आहे. आता अमेरिकेने सिंगापुरच्या नागरिकावर अमेरिकेत चीनसाठी हेरगिरी केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सोबतच एका चीनी संशोधकांला सुद्धा ओळख लपवून अमेरिकेत राहणे आणि हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अमेरिकेला शंका आहे की, चीनी हेर ओळख बदलून अनेक ठिकाणी राहात आहेत आणि बौद्धिक संपदा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेचा हा संशय काही प्रमाणात सत्य देखील आहे. चीनजवळ हेरांची एक टोळीच आहे जी जगभरात पसरलेली आहे. जाणून घ्या, कसे काम करतात चीनी हेर…

प्रत्येक देशात गुप्त काम
प्रत्येक देशाकडे गुप्तचर म्हणजे इंटेलिजन्स एजन्सी असते. ती एजन्सी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेत असते. एखादा शत्रू देश कोणत्याही प्रकारची राजकीय अस्थिरता किंवा सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, हे देखील पाहिले जाते. भारतात सुद्धा रॉ नावाची गुप्तचर एजन्सी हे काम करत आहे. सोबतच जगात होत असलेल्या बदलांवर सुद्धा त्यांचे लक्ष असते. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये सुद्धा वेगवेगळे आणि हुशार गुप्तचर विभाग आहेत. चीनजवळ सुद्धा अधिकृत जी एजन्सी आहे तिला मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी म्हणतात.

चीन अवलंबत आहे वेगळी पद्धत
हेरगिरीसाठी चीनमध्ये गुप्त पद्धतीने वेगवेगळे लोक काम करतात. हे कोणत्या एजन्सीसाठी नव्हे, तर व्यक्तीगत पद्धतीने काम करत असतात. त्यांचे काम असते, वेष बदलून दुसर्‍या देशात राहाणे आणि माहिती घेणे. हे लोक सामान्यपणे नोकरीच्या निमित्ताने दुसर्‍या देशात जातात, ज्यामध्ये चीनचे सरकार त्यांना ओळख लपवण्यास मदत करते. तेथे राहून हे लोक माहिती जमवतात आणि चीनच्या हेडक्वार्टरला ती माहिती पुरवतात.

चीनी सरकारचे कौतूकसुद्धा यांचे काम
चीन या लोकांकडून हेरगिरीसह इतर कामे सुद्धा करून घेतो. उदाहरणार्थ हे लोक दुसर्‍या देशात राहून चीनच्या धोरणांची पब्लिसिटी करतात. चीनी सरकारचे कौतूक असे करतात की, जवळपासच्या परदेशी लोकांना विश्वास वाटेल की, कम्युनिस्ट पार्टीच्या सत्तेत काही वाईट नाही, तर जनता खुश आहे. या गँगमध्ये प्रत्येक क्षेत्रात काम करणारे लोक असता, जसे की, पत्रकार, डॉक्टर-नर्स, संशोधक, एवढेच नव्हे, तर रिसेप्शनवर काम करणारे लोक सुद्धा असे आहेत. हे लोक इतरांना सतत भेटत असतात.

परदेशी सुद्धा करत आहेत चीनसाठी काम
हे केवळ चीनचेच नव्हे, तर परदेशी सुद्धा असतात. त्यांना मोठी रक्कम देऊन आपला प्रचार करण्यासाठी तयार केले जाते. सोबतच परदेशात काम करत असलेल्या चीनी कंपन्यासुद्धा आपल्या सरकारसाठी हेरगिरी करतात. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार प्रत्येक कंपनीचा एक गुप्त सेल असतो, जो कम्युनिस्ट पार्टीला माहिती देतो की कुठे काय चालले आहेत. यांचे इती काम हे आवरण म्हणजे देखावा असतो.

कोणते आहे ताजे उदारहण
विऑनच्या एका रिपोर्टनुसार, नुकतेच एका ऑस्ट्रेलियन खासदारावर संशायातून कारवाई करण्यात आली आहे. हा नेता वाजवीपेक्षा जास्त चीनची बाजू घेताना दिसत होता. एवढेच नव्हे, तर कोरोनाच्या बाबतीत सुद्धा तो चीनच्या बाजूने बोलत होता, ते सुद्धा तेव्हा, जेव्हा त्याच्या देशातील लोक कोरोनाने संक्रमित होत होते. शंका आल्यानंतर या नेत्याच्या ऑफिसवर छापा मारण्यात आला आणि याबाबत तपास करण्यात आला. हा एकमेव व्यक्ती नसून, प्रभावशाली पदांवर बसलेले अनेक लोक चीनसाठी काम करत आहेत. जसे की, हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर चार्ल्स लायबर यांनाही या आरोपाखाली पकडण्यात आले. तपासात अमेरिकन अधिकार्‍यांना आढळले की, प्रोफेसरला चीनच्या बाजूने बोलण्यासाठी आणि हेरगिरी करण्यासाठी 1 मिलियन डॉलर देण्यात आले होते.

मोठ्या पदावरील लोक सामील
चीन नेहमी त्या लोकांशी संपर्क साधतो, जे मोठ्या पदावर काम करतात. यामुळे जास्त लोकांवर प्रभाव पडतो. हे चीन आपल्याबाजूने वातावरण निर्मितीसाठी करत असतो. कथित प्रकारे चीनसाठी काम करणारे लोक जगाच्या वेगवेगळ्या 500 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीत पसरलेले आहेत. हे स्कॉलर आहेत, जे बातम्या चीनपर्यंत घेऊन जातात आणि चीनसाठी वातावरण तयार करतात. अनेक पत्रकार आहेत, ज्यांना चीनचा दौरा घडवून भेट देऊन प्रो-चायना बनवले जाते. देशात परतून ते चीनचे कौतूक करणारी आर्टिकल, संपादकीय लिहितात. नुकतेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्ट्सने एक सर्वे केला. यामध्ये परदेश प्रवास करत असलेल्या 58 पत्रकारांशी चर्चा केली. यामध्ये चीनच्या दौर्‍याचा प्रकार समोर आला.

हेरगिरीची एकदम नवी परंपरा
एकुणच चीन हेरगिरीसाठी गुप्तचर यंत्रणांवरच अवलंबून नाही, तर यासाठी तो नव्या पद्धती अवलंबत आहे. अशा प्रकारचे हेर तयार करणे हेरगिरीची नवी परंपरा आहे. यामध्ये हेर समाजातील प्रसिद्ध चेहरा असतो, लपून काम करत नाही. हेरगिरीसह तो चीनच्या धोरणांसाठी वातावरण तयार करतो.

चीनी अ‍ॅपसुद्धा करतात हेरगिरी
याशिवाय चीनी अ‍ॅप सुद्धा देशात हेरगिरीचे काम करतात. यावरूनच भारत सरकारने गलवान खोर्‍यात 20 भारतीय जवान शहीद झाल्यानंतर 59 चीनी अ‍ॅप्स बॅन केले. गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरच्या रिपोर्टच्या आधारावर सरकारने ही कारवाई केली. या अ‍ॅप्सबाबत अगोदरही अनेक इशारे देण्यात आले पण जबाबदार राजकीय नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.