पावसाळ्यात प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा, महिलांसाठी आवश्यक

पोलिसनामा ऑनलाइन – पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे विविध शारीरीक समस्या उद्भवतात. यासाठी स्वतःची स्वच्छता, निर्जंतुकीकरण महत्वाचे असते. या काळात महिलांना यूटीआय म्हणजेच मूत्रमार्गाच्या भागातील संसर्ग होण्याचा धोका खुप जास्त असतो. यासाठी अशा अवयवांची स्वच्छता राखणे खूप महत्वाचे ठरते. उष्णता आणि घाम टिकून ठेवणार्‍या गोष्टींमुळे बॅक्टेरियाची वाढ आणि योनीतून संसर्ग होण्याचा धोका असतो.

या टिप्स लक्षात ठेवा

1. स्वतःला हायड्रेटेड ठेवा
यूरिनरी ट्रॅक्ट (मूत्रमार्गाच्या) च्या आरोग्यासाठी भरपूर पाणी आणि फळांचा रस प्या. वातावरणात आर्द्रतेमुळे आणि घामामुळे, व्यक्ती शरीरातील महत्त्वपूर्ण द्रव गमावते आणि यामुळे लघवीच्या दरम्यान अंतरभागात त्रास होऊ शकतो.

2. खाण्याची सवय ठेवा
मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जास्त आम्लयुक्त आहार पीएचमुळे असंतुलन होते, दुर्गंधी वाढते. दही, कांदा, लसूण, स्ट्रॉबेरी आणि हिरव्या पालेभाज्या खा.

3. कोरडे कपडे
दमट, ओलसर कपड्यांमुळे हा त्रास होऊ शकतो. या काळात खूप घाम येतो. त्वचेला हवा लागेल अशाप्रकारचे इनरवियर / लिंगरी फॅब्रिक वापरावेत. पावसात भिजत असाल तर त्वरीत आंघोळ करा आणि शरीर कोरडे करा.

4. घट्ट कपडे
खूप घट्ट कपडे घातल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. हवेचा प्रवाह थांबवणारे कपडे टाळा. झोपताना सैल कपडे घाला.

5. स्वच्छता व हाइजीन
बॅक्टेरियाच्या संसर्गापासून आणि गंधांपासून मुक्त होण्यासाठी अंतर्गत भाग स्वच्छ ठेवा. सकाळच्या अंघोळी दरम्यान आणि झोपेच्या आधी दिवसातून दोनदा अंतर्भाग स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला जातो. स्वच्छ आणि कोरडे कपडे वापरा.